Manoj Jarange Sabha : ‘फडणवीससाहेब, सदावर्तेला समज द्या, तो तुमचा कार्यकर्ता’; मनोज जरांगे पाटलांचा हल्लाबोल

Antarwali Sarati News : तू एकदा मराठ्यांचं वाटोळं केलेलं आहे, तुला एकदा मराठ्यांनी सुटी दिली आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Jalna News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससाहेब ॲड. गुणरत्न सदावर्तेला समज द्या. तो तुमचा कार्यकर्ता आहे. मराठे अंगावर घेऊ नका. याच मराठ्यांनी तुम्हाला १०६ आमदार निवडून दिले आहेत, ते तुम्ही विसरू नका. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आणण्यामध्ये मराठ्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला दिला. (Fadnavis, make Ad Sadavarte understand; He is your worker' : Manoj Jarange Patil)

जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे शनिवारी (ता. १४ ऑक्टोबर) मराठा आरक्षणासंदर्भात सभा झाला. त्या सभेत बोलताना जरांगे पाटील यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. सभेसाठी मराठा समाज मोठ्या प्रमाणात अंतरवाली सराटीत एकवटला होता.

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर जरांगे पाटील यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, शुक्रवारी रात्री एक टरमळं (ॲड. गुणरत्न सदावर्ते) उठलं. ते तर रात्री वेगळंच काही तरी बोललं. तो पण एका उपमुख्यमंत्र्यांंचा कार्यकर्ता आहे, असं लोकं म्हणतात. उपमुख्यमंत्र्यांनी येडपटं पाळलीच कशी. उपमुख्यमंत्री एकतर लय झालेत. ती एक पंचाईत झाली आहे. जरांगे पाटील यांना अटक करा. ते हिंसा करतील, असं ते रात्री सांगत होतं.

सदावर्ते याला यश मिळायचं होतं; म्हणून त्याने आझाद मैदानावर एक मराठा, लाख मराठा अशी घोषणा दिली होती. आता एक लाख मराठे एकत्र आले आहेत. त्यांच्या गोरगरीब पोरांचं कल्याण होणार आहे. आता तो म्हणतोय की, जरांगे पाटील हिंसा करणार आहे, त्याला अटक करा. मला अटक करणं आता एवढं सोपं आहे का. तू एकदा मराठ्यांचं वाटोळं केलेलं आहे, तुला एकदा मराठ्यांनी सुटी दिली आहे. मराठा आरक्षणाच्या विरोधात हाच सदावर्ते कोर्टात गेला होता. मराठ्यांच्या विरोधात आग ओकण्याचे काम करत आहे, असा आरोपही जरांगे पाटील यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समज द्यावी. खालचे कार्यकर्ते ते आमच्या अंगावर घालत आहेत. तुमच्यासाठी मराठ्यांनी काहीही केलेलं आहे. केंद्र आणि राज्य सरकारला मी विनंती करतो की, मराठ्यांना आरक्षण द्या. हेच मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. मराठ्यांना विरोध करायचे बंद करा आणि मराठा समाजाला तातडीने आरक्षण जाहीर करावे. हे मराठे दिल्लीपर्यंत तुमच्या अंगावर गुलाल टाकतील, असा शब्दही जरांगे पाटील यांनी या सभेत बोलताना दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com