Somnath Suryawanshi On Suresh Dhas : Reaction : सुरेश धस पहाटे तीन वाजता भेटायला आले, पोलिसांना माफ करा म्हणाले! सूर्यवंशी कुटुंबियांच्या आरोपाने खळबळ

Family of deceased Somnath Survanshi make serious allegations against MLA Suresh Dhas. Read the full story here. : सुरेश धस दुहेरी बोलत आहेत, त्यांची प्रवृत्ती योग्य नाही. आम्ही शांत आहोत तोपर्यंत ठिक, पण जर आम्हाला न्याय मिळाला नाही, तर आम्हाला हातात शस्त्र घ्यावे लागेल.
Somnath Suryawanshi Family-MLA Suresh Dhas New
Somnath Suryawanshi Family-MLA Suresh Dhas NewSarkarnama
Published on
Updated on

गणेश पांडे

Parbhani News : भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्यावर परभणी येथे पोलीसांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियाने गंभीर आरोप केले आहेत. धस हे रात्री अडीच वाजता आपल्या घरी आले होते आणि त्यांनी पोलीसांना माफ करा, अशी विनवणी आपल्याकडे केली होती, असा दावा विजयाबाई सूर्यवंशी यांनी केला. आमदार धस यांनी स्वतःचे कुटुंब पोलिसांच्या स्वाधीन करावे, अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

परभणी (Parbhani) येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ मोठे आंदोलन झाले होते. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत लाठीमार, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या. शकडो आंदोलकांवर तेव्हा अटकेची कारवाई करण्यात आली होती. यापैकीच एक असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाला होता. परंतु सोमनाथ यांचा मृत्यू पोलीसांनी केलेल्या मारहाणीत झाल्याचा दावा कुटुंबियांनी केला होता.

सोमनाथ यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये देखील याला दुजोरा देण्यात आल्यानंतर संबंधित पोलीसांवर कठोर कारवाई करण्याची मागणी झाली. काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या तर काही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. नुकतीच चार पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सरकारकडून करण्यात आली. दरम्यान, सूर्यवंशी कुटुंबाने जाहीर पत्रकार परिषद घेत भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Somnath Suryawanshi Family-MLA Suresh Dhas New
Suresh Dhas statement : काही गोष्टी गोपनीय ठेवलेल्याच बऱ्या; सुरेश धसांचे वक्तव्य बीडचे राजकारण तापवणार ?

मयत सोमनाथ सूर्यवंशी यांची आई विजयाबाई व भाऊ अविनाश यांनी आमदार सुरेश धस रात्री 2.50 वाजता भेटायला आले. त्यांनी आम्हाला मोठं मन करून पोलिसांना माफ करण्यास सांगितले. मात्र आम्ही दगड फोडून पोट भरणारे लोक आहोत, आम्ही कुणालाही माफ करणार नाही. आमदार धस यांनी स्वतःचे कुटुंब पोलिसांच्या स्वाधीन करावे, त्यांना मारहाण करून घ्यावी आणि मग पोलिसांना माफ करावे, अशा शब्दात सुनावले. माझे लेकरू मला परत द्यावे. ज्या पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशीला मारले, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

Somnath Suryawanshi Family-MLA Suresh Dhas New
Parbhani violence : परभणीतील हिंसाचार अन् हिंदू संघटनांचा मोर्चा, सोमनाथ सुर्यवंशीचा मृत्यू कशामुळे? सभागृहात CM फडणवीसांनी दिली A टू Z माहिती

अन्यथा आम्ही शस्त्र उचलू

परभणी हिंसाचार प्रकरणातील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे कुटुंब आणि समर्थक संतप्त झाले आहेत. या प्रकरणात पोलिसांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि अन्यायग्रस्त तरुणांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी सोमनाथ सूर्यवंशी यांचे भाऊ अविनाश सूर्यवंशी यांनी केली. पोलिसांनी माझ्या भावाला मारले, मग त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार की नाही? परभणी हिंसाचारातील सर्व तरुणांवरील गुन्हेही मागे घेण्यात यावेत.

Somnath Suryawanshi Family-MLA Suresh Dhas New
Somnath Suryawanshi News : मृत सोमनाथ सूर्यवंशीचा 'पीएम' रिपोर्ट आला..

हे गुन्हेगारांचे सरकार आहे, आमच्या भावाच्या मृत्यूनंतर तपासात काय झाले, याची माहिती आम्हाला दिली जात नाही, असा आरोपही अविनाश यांनी केला. सुरेश धस दुहेरी बोलत आहेत, त्यांची प्रवृत्ती योग्य नाही. आम्ही शांत आहोत तोपर्यंत ठिक, पण जर आम्हाला न्याय मिळाला नाही, तर आम्हाला हातात शस्त्र घ्यावे लागेल. अधिकाऱ्यांचे खून करण्यास भाग पाडू नका, असा इशाराही अविनाश यांनी यावेळी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com