Harshvardhan Jadhav News : राजकारणात काही नको म्हणणारे जाधव अचानक विधानसभेच्या तयारीला ? हे आहे कारण..

Chandrakant Khaire : खैरेंना पराभूत करण्यास हर्षवर्धन जाधव हेच जबाबदार असल्याची भावना कन्नड-सोयगाव मतदारसंघातील जनतेची देखील झाली होती.
Harshvardhan- Sanjana Jadahv-Khaire Political News
Harshvardhan- Sanjana Jadahv-Khaire Political NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) हे सातत्याने आपल्या भूमिका बदलत असतात. काही महिन्यांपूर्वी आपल्याला आता राजकारणात काहीही नको असे म्हणत निवडणूक लढण्याची इच्छा नसल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मात्र आता गेल्या विधानसभा निवडणुकीत आपण मनापासून लढलो नाही ती चूक झाली आता स्वर्गीय रायभान जाधव यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विधानसभेच्या तयारीला लागलो आहे, असे एका व्हिडिओच्या माध्यमातून हर्षवर्धन जाधव यांनी जाहीर केले.

Harshvardhan- Sanjana Jadahv-Khaire Political News
MNS Warn News : आधी बाभळीचा पाणीप्रश्न सोडवा, मगच पाय ठेवा ; केसीआरांची सभा उधळणार

त्यांनी ही भूमिका अचानक का घेतली? याचे कारण आता समोर आले आहे. (Shivsena) दोन दिवसांपूर्वी संजना जाधव या सोयगाव तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या, यावेळी त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करत राहणार असे जाहीर करतानाच पक्षाने संधी दिली तर कन्नड सोयगावमधून लढणार असल्याचे सुतवाच केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करत आपण विधानसभेच्या तयारीला लागलो, असे जाहीर केले.

हे जाहीर करत असताना लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला होता, मात्र आता आपला पाठिंबा त्यांनाच असणार आहे. पुढचे खासदार चंद्रकांत खैरे असतील असेही ते म्हणाले. यामागे देखील हर्षवर्धन यांची चतुर खेळी दिसून येते. खैरे यांच्या लोकसभेतील पराभवाला जबाबदार राहिलेल्या हर्षवर्धन जाधव यांना मतदारांनी विधानसभेत सपाटून आपटले होते. खैरेंना पराभूत करण्यास हर्षवर्धन जाधव हेच जबाबदार असल्याची भावना कन्नड-सोयगाव मतदारसंघातील जनतेची देखील झाली होती.

त्यामुळेच मतदारांनी हर्षवर्धन जाधव यांना पराभूत करत उदयसिंह राजपूत यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले होते. लोकसभेत खैरेंचा झालेला पराभव आपल्यामुळेच झाला हा डाग मिटवून कन्नड विधानसभा पुन्हा जिंकण्याच्या विचारानेच हर्षवर्धन यांनी खैरींशी पंगा नको म्हणून थेट त्यांना आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले.

अर्थात शिवसेना किंवा चंद्रकांत खैरे यांच्याकडून या संदर्भात अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नसली तरी विधानसभा निवडणुकीत संजना विरुद्ध हर्षवर्धन असा थेट सामना रंगला तर खैरे यांची मदत व्हावी, या हेतूनेच जाधव यांनी लोकसभेसाठी त्यांना पाठिंबा जाहीर केल्याचे बोलले जाते. लोकसभा आणि विधानसभा या दोन्हीही निवडणुकांना दीड वर्ष अवधी आहे, मात्र त्याची तयारी जाधव यांनी आतापासूनच सुरू केल्याचे दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com