Latur News : लाख रुपयाचं नूकसान झालयं, साडेआठ हजाराने काय होतयं साहेब..पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासमोर शेतकऱ्यांची व्यथा!

Marathwada Flood-Heavyrainfall : आम्ही लेकराचे शिक्षण कसं करायचं, जनावरांना कसं जगवायचं, शेतीसाठी काढलेले कर्ज कसे फेडायचे, रब्बी हंगाम पेरणी कशी करायची? शेतीचे साहित्य वाहून गेले आहे.
Shivendraraje Bhosale Visit Latur Affected Farmers News
Shivendraraje Bhosale Visit Latur Affected Farmers NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. सातार्‍यात शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाल्यानंतर शासनाने फक्त साडेआठ हजार रुपयांची मदत जाहीर केली.

  2. या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांनी पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासमोर संताप व्यक्त केला.

  3. शेतकऱ्यांचा प्रश्न — “लाखाचं नुकसान झालं, मग साडेआठ हजार मदत ही चेष्टा नाही का?”

Heavyrain Affected Farmers : अतिवृष्टी, महापूराने शेतकऱ्यांचे लातूर जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले. पंचनामे, पाहणी दौरे, नेत्यांचे बांधावर जाणे हे सगळे झाले, पण प्रत्यक्षात मदत अजून शेतकऱ्यांच्या हातात पडली नाही. अशावेळी शेतकऱ्यांचा संयम सुटू लागला आहे. लातूर जिल्हा दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासमोर एका शेतकऱ्याने झालेले नुकसान आणि सरकारने देऊ केलेली मदत यातील तफावतच मांडली.

लाख रुपयाचं आमचं नुकसान झालयं साहेब, साडेआठ हजार रूपयाच्या मदतीनं काय होतंय? एक एकरचा पेरणी खर्च तरी निघतो का? असा उद्विग्न सवाल त्या शेतकऱ्याने (Affected Farmers) केला. अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी साडेआठ हजार रुपये मदत म्हणजे ही शेतकऱ्याची चेष्टा आहे. साडेआठ हजार रुपयांमध्ये एकराचा पेरणी खर्चही निघत नाही. लाख रुपयाचा आमचं नुकसान झालं अन् सरकार हेक्टरी साडेआठ हजार रुपये मदत करत आहे. साडेआठ हजार रुपयात काय होतयं, अशा भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहेत.

पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले (Shivenderaraje Bhosale) यांच्यासमोर मसलगा ता. निलंगा येथील शेतकऱ्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. हेक्टरी किमान 50 हजार रुपये शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. कर्नाटक सरकारकडून जो भरीव निधी शेतकऱ्यांना दिला जात आहे. त्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारने मदत करावी. नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात जमिनी खरडून गेल्या आहेत. मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी झाली मात्र शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागणार नाही.

Shivendraraje Bhosale Visit Latur Affected Farmers News
Marathwada Flood Relief: पूरग्रस्तांच्या मदतीला सरकारआधी धावला 'देवबाप्पा'; सिध्दीविनायक, शिर्डीसह 'या' देवस्थानांकडून कोट्यवधींची मदत

त्यामुळे सरकारने हेक्टरी साडेआठ हजार रुपये न देता हेक्टरी 50 हजार रुपयाची मदत करावी. त्याचबरोबर साडेआठ हजार रुपयांमध्ये शेतीचा एका एकरचा खर्चही निघणे अवघड आहे. ही मदत अतिशय तुटपुंजी असून लाखो रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असतानाही शासन शेतकऱ्याची चेष्टा करत आहे, असा आरोप काही शेतकऱ्यांनी केला. आम्ही लेकराचे शिक्षण कसं करायचं, जनावरांना कसं जगवायचं, शेतीसाठी काढलेले कर्ज कसे फेडायचे, रब्बी हंगाम पेरणी कशी करायची? शेतीचे साहित्य वाहून गेले आहे.

Shivendraraje Bhosale Visit Latur Affected Farmers News
Shivendra Raje Bhosale : शिवेंद्रराजे भोसले काँग्रेसवर कडाडले; म्हणाले, 'महाराजांना बदनाम करण्याचे षडयंत्र'

अशा एक ना अनेक समस्या या पाहणी दौऱ्यात शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांना सांगितल्या. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व महापुराने मोठे नुकसान झाले आहे. प्रसंगी शासनाचे निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांसाठी मदत केली जाईल, तुम्ही खचून जाऊ नका, धीर धरा सरकार निश्चित तुमच्या पाठीशी आहे असे, आश्वासन पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिले.

उस बिलातून कपात नको

राज्य शासनाने प्रति टन पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी पंधरा रुपये कपातीचा निर्णय घेतला आहे, हा निर्णय शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा आहे. प्रति टन 15 रुपयाची कपात रद्द करावी कारण कारखाने हे त्यांना मिळणाऱ्या नफ्यातून नव्हे तर शेतकऱ्याच्या खिशातून कपात करणार आहेत. आर्थिक भुर्दंड हा शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे. राज्य शासनाने निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी काही शेतकऱ्यांनी यावेळी केली. या निर्णयाबाबत आपण स्वतः मुख्यमंत्री यांच्यशी बोलू, असे आश्वासन शिवेंद्रराजे यांनी दिले.

FAQs

1. शेतकऱ्यांनी काय मागणी केली आहे?
शेतकऱ्यांनी नुकसानानुसार योग्य भरपाई देण्याची आणि मदत रक्कम वाढवण्याची मागणी केली आहे.

2. शासनाने किती मदत जाहीर केली आहे?
शासनाने सध्या साडेआठ हजार रुपयांची मदत घोषित केली आहे.

3. किती नुकसान झालं आहे?
अनेक शेतकऱ्यांचे एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

4. पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी काय प्रतिक्रिया दिली?
त्यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे.

5. पुढील पाऊल काय असू शकते?
शेतकरी संघटनांकडून आंदोलन तीव्र करण्याची शक्यता आहे, जर मदत रक्कम वाढवली गेली नाही तर.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com