Abdul Sattar Appeal News : शेतकऱ्यांनो शंभर मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी नको..

Farmers : १ रुपयांत पीकविमा, केंद्र सरकारप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी ६ हजार रुपये मानधन क्रांतिकारी निर्णय.
Minister Abdul Sattar News, Maharashtra
Minister Abdul Sattar News, MaharashtraSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे. (Abdul Sattar Appeal News) किमान ७० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी असेही सत्तार म्हणाले. शेतकरी परिसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.

Minister Abdul Sattar News, Maharashtra
Pankaja Munde News : भाजपची डबा पार्टी पंकजा मुंडेना गतवैभव मिळवून देणार का ?

कापूस पीक सुधारित लागवड तंत्रज्ञान बाबत तसेच पेरण्या उशिरा होत असल्याने कापूस व इतर पीक लागवड तसेच खतांच्या व्यवस्थापनासाठी कृषी विभागाने गावागावांत जावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असे निर्देश देखील सत्तार (Abdul Sattar) यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

कापूस पीक सुधारित लागवड तंत्रज्ञान व्यवस्थापन बाबत सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. (Farmers) शेती हा उद्योग व्हावा यातून शेतकरी सक्षम व्हावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या (Marathwada) मार्गदर्शनाखाली कृषी विभागाच्या माध्यमातून महत्वकांक्षी निर्णय घेण्यात आले.

१ रुपयांत पीकविमा, केंद्र सरकारप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी ६ हजार रुपये मानधन असे अनेक क्रांतिकारी निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतले. सिल्लोड-सोयगाव तालुक्यात मका आणि कापूस पिकांची सर्वाधिक लागवड होते. त्यामुळे गेल्या आठवड्यात सिल्लोड येथे मका संशोधन केंद्र उभारणीला शासनाने मान्यता दिली.

त्याच पध्दतीने तालुक्यात कापूस उपकेंद्र सुरू करण्यात येणार असून सदरील प्रस्ताव मंजुरी स्तरावर असल्याची माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली. सोयगाव येथे कृषी महाविद्यालय, सिल्लोड तालुक्यात रेशीम महाविद्यालय, कृषी औद्योगिक क्षेत्र, कृषी भवन असे अनेक विकास कामे मतदारसंघात गतिमान पध्दतीने करणार असल्याचे सत्तार यांनी सांगितले.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com