Maratha Reservation News : मनोज जरांगेंच्या उपोषणाचा पाचवा दिवस, अन् न पेलणारे आंदोलन सुरू..

Maharashtra News : संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व एसटी बसेस बंद करण्यात आल्या आहेत. हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर जिल्ह्यातील बसेसही बंद.
Manoj Jarange Patil News
Manoj Jarange Patil NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : मराठा आरक्षणासाठी सरकारने मागितलेली एका महिन्याची आणि मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली दहा दिवसांची अतिरिक्त मुदत संपल्यानंतर अंतरवाली सराटीतील बेमुदत उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. (Maratha Reservation News) उपोषण सुरू करण्यापुर्वी मनोज जरांगे यांनी पुढचे आंदोलन हे सरकारला झेपणारही नाही अन् पेलणारही नाही, असा इशारा दिला होता. त्याची प्रचिती आता राज्याच्या विशेषतः मराठवाड्यात येऊ लागली आहे.

Manoj Jarange Patil News
Maratha Reservation News : जरांगेंची सरकारला अजून एक संधी ; चर्चेला या, एकदाचं आरक्षण द्यायचं का नाही ते सांगा ?

अन्न-पाण्याशिवाय बेमुदत सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस. जरांगे यांनी सांगितल्याप्रमाणे या दरम्यान त्यांनी वैद्यकीय उपचारही घेतले नाही. (Marathwada) आता त्यांचा आवाज खोल गेला आहे, हात थरथरायला लागले आहेत. (Jalna) जरांगे यांची प्रकृती जसजशी खालावत आहे, तसतसे राज्यभरात सुरू असलेले आंदोलन पेटत आहे. साखळी उपोषणाचे रुपांतर आता बेमुदत उपोषणात करा, असे आवाहन जरांगे यांनी अंतरवालीतून केल्यानंतर आंदोलन अधिक तीव्र आणि सरकारला न झेपणारे, न पेलवणारे ठरणार आहे.

जालना जिल्ह्यात संतप्त मराठा समाजाच्या तरुणांनी तहसिलदारांची गाडी फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. तहसीलदार छाया पवार जालन्यातील रामनगर भागात आल्या होत्या. (Maratha Reservation) तेव्हा मोबाईल टॉवरवर चढलेलेल्या आंदोलकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत आंदोलकांनी त्यांची गाडी फोडली. तहसीलदार यांनी चर्चेसाठी गावात येण्याची गावकऱ्यांची मागणी होती. त्यानंतर रामनगर येथे आंदोलकांकडून रस्ता रोकोही करण्यात आला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आंदोलनस्थळा जवळून जात असतांनाच त्यांची गाडी आडवून दगडफेक करण्यात आली. दुसरीकडे नांदेड, बीड जिल्ह्यात एसटी बसवर दगडफेक करण्यात आली आहे. आंदोलकांकडून एसटी बसेसला लक्ष्य केले जात असल्यामुळे खबरदारी म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व एसटी बसेस बंद करण्यात आल्या आहेत. हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर जिल्ह्यातील बसेसही बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक एसटी प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे बहुतांश मराठवाड्यातील एसटी सेवा आता ठप्प झाली आहे.

राजकीय नेत्यांचे ताफे अडवणे, त्यांना मराठा आरक्षणासाठी जाब विचारणे, राजीनाम्याची मागणी करणे असे प्रकार रोज घडत आहेत. जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असल्याने मराठा समाज चिंतेत आहे. अंतरवालीतील गावकऱ्यांनी सरकारला तात्काळ मराठा आरक्षणाचा निर्णय घ्या, अन्यथा सगळं गाव लहान मुला-बाळांसह उपोषणाला बसेल, असा इशारा दिला आहे. राज्य सरकारकडून अजूनतरी काही ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. सरकारकडून जितका विलंब होईल, तितके हे आंदोलन चिघळेल, असे चित्र आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com