अखेर अजित पवारांनी बाबाजानी दुर्राणींना भेटीला बोलावले..

अजित पवार यांचे विश्वासू राजेश विटेकर यांना जिल्हाध्यक्षपद देण्यासाठीच दुर्राणी यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण अजित पवारांनी स्वीकारल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात होती. (Parbhani Ncp)
Ajit Pawar-Durrani
Ajit Pawar-DurraniSarkarnama
Published on
Updated on

परभणी ः राष्ट्रवादी काॅंग्रेसचे विधान परिषदेतील आमदार व परभणीचे जिल्हाध्यक्ष बाबाजाणी दुर्राणी (Babajani Durrani) यांना अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भेटीसाठी मुंबईला बोलावले. काल दुर्राणी यांना निरोप मिळाला आणि रात्रीच ते मुंबईला रवाना झाल्याची माहिती आहे. (Marathwada) पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून दुर्राणी यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठवला होता.

पक्ष आपल्या राजीनाम्याची दखल घेईल, आपली समजूत काढेल असा दुर्राणी यांचा समज झाला, परंतु जंयत पाटील यांनी त्यांना भेट दिली असली तरी तीन दिवस मुंबईत मुक्काम करूनही दुर्राणींना अजित पवार भेटले नव्हते. त्यामुळे दुर्राणी रिकाम्या हाताने परभणीत परतले होते. अजित पवार भेट देत नसल्यामुळे दुर्राणी यांनी मुंबईत काॅंग्रेसचे नेते कन्हैयाकुमार यांची भेट घेत त्या भेटीचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल केले होते.

मात्र त्याचाही तेव्हा फारसा उपयोग झाला नव्हता. पक्षातील नेते जिल्ह्यातील अंतर्गत गटबाजीला खतपाणी घालतात असा आरोप दुर्राणी यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देतांना केला होता. अजित पवार यांचे विश्वासू राजेश विटेकर यांना जिल्हाध्यक्षपद देण्यासाठीच दुर्राणी यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण अजित पवारांनी स्वीकारल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात होती.

त्यातच दुर्राणी हे राष्ट्रवादी सोडून काॅंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा देखील होत्या. काॅंग्रेचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दुर्राणी यांना फोन करून पक्षप्रेवशाची आॅफर दिल्याचे देखील समजते. दुर्राणी यांच्या काॅंग्रेस प्रवेशाचा मुहूर्त देखील ठरला असून आधी त्यांचा मुलगा जुनेद आणि शेकडो समर्थक काॅंग्रेसमध्ये प्रवेश करतील आणि त्यानंतर बाबाजानींचा प्रवेश होईल, असेही बोलले जाते.

Ajit Pawar-Durrani
सत्तारांच्या सोयगांवात आघाडीत बिघाडी; नगर पंचायतीच्या सर्व जागांवर शिवसेनेचे उमेदवार

दरम्यान, अजित पवारांच्या भेटीसाठी बाबाजानी मुंबईत ठाण मांडून बसले होते. परंतु त्यांना भेट मिळाली नाही. कन्हैयाकुमारांची घेतलेली भेट, दुर्राणींच्या काॅंग्रेस प्रवेशाची चर्चा या दबावतंत्रानंतर अजित पवारांनी दुर्राणींना भेटीसाठी बोलावले का? असे देखील बोलले जात आहे. आता अजित पवार-दुर्राणी यांच्या भेटीत नेमके काय होते? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com