सत्तारांच्या सोयगांवात आघाडीत बिघाडी; नगर पंचायतीच्या सर्व जागांवर शिवसेनेचे उमेदवार

महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र सध्या असले तरी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत पडद्यामागे काय राजकीय घडामोडी घडतात यानंतरच चित्र स्पष्ट होईल. ( Minister Abdul Sattar)
Soygaon Nagarpanchayat
Soygaon NagarpanchayatSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद ः शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या सिल्लोड-सोयगांव मतदारसंघातील सोयगांव नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. (Shivsena) राज्याच्या सत्तेत असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस पक्षाने इथे मात्र स्वतंत्र अर्ज दाखल केले आहेत. (Marathwada) स्वबळावर नगरपंचायत ताब्यात घेण्याचे सत्तार यांचे प्रयत्न असल्यामुळे त्यांनी शिवसेनेचे सतरा उमेदवार मैदानात उतरवले आहेत.

काॅंग्रेसने देखील सर्व जागांवर उमेदवार दिले आहेत. राष्ट्रवादीने ८ जागांवर उमेदवार दिल्यामुळे हे तिघेही स्वतंत्र लढणार असे आजचे चित्र आहे. नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असली तरी ओबीसींचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे चार प्रभागातील निवडणूक रद्द झाली आहे.

महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र सध्या असले तरी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत पडद्यामागे काय राजकीय घडामोडी घडतात यानंतरच चित्र स्पष्ट होईल. तुर्तास महाविकास आघाडीतील तीन्ही पक्ष स्वतंत्र मैदानात उतरल्याने भाजपच्या आकांक्षा वाढल्या आहेत. सोयगांवच्या नगरपंचायतीत भाजपची सत्ता होती. पाच वर्षात दोनवेळा भाजपने अध्यक्षपद भुषवले होते, तर एकदा अविश्वास ठरावामुळे शिवसेनेला संधी मिळाली होती.

यावेळी मात्र नगरपंचायतीवर एकहाती भगवा फडकवण्याचा दावा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे. त्यामुळेच राज्यात महाविकास आघाडी असली तरी स्थानिक पातळीवर स्वतंत्रच लढायचे, अशी भूमिका सत्तार यांनी घेतल्याचे दिसते. महाविकास आघाडीत बिघाडी झाली असे चित्र सध्या दिसत असले तरी ते कायम राहते, की मग उमेदवारी मागे घेण्याच्या तारखेपर्यंत बदलते हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

Soygaon Nagarpanchayat
अतिवृष्टीग्रस्तांच्या यादीतून वगळले; लोणीकर म्हणाले, अधिकाऱ्यांच्या ढोपरात इंजेक्शन टोचा

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा विधानसभा मतदारसंघ व भाजपचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जालना लोकसभा मतदारसंघातील या नगरपंचायतीच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवत सत्तार यांनी गेल्या वर्षभरात तालुक्यात विविध विकासकामांचे उद्घाटन, व शुभारंभ करत तयारी सुरू केली होती. सोयगांवमधील त्यांचे दौरे देखील वाढले होते.

तर भाजपने मात्र निवडणुका जाहीर झाल्यानंतर हालचाली सुरू केल्या होत्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवत भाजपने शिवसेनेला आव्हान दिल्याचे चित्र आहे. आता चारही पक्षांचे स्वबळ कायम राहते ? की मग तडजोडी करून माघार घेतली जाते यावरच निवडणुकीची रंगत असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com