Shivsena UBT News : दिनेश परदेशी यांनी पितृपक्षातच पक्ष बदलला, हाती शिवबंधन बांधले

Finally BJP's Dinesh Pardeshi tied Shivbandhan on his hands : उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसात प्रवेश करा, नाहीतर विषय संपवा, असे स्पष्ट शब्दात बजावल्यामुळे आज पितृपक्षातच दिनेश परदेशी यांचा घाईघाईने पक्ष प्रवेश करून घेण्यात आला.
Dinesh Pardeshi Vaijapur News
Dinesh Pardeshi Vaijapur NewsSarkarnama
Published on
Updated on

Vaijapur Assembly Constituency 2024 : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराचे वारे पुन्हा वाहू लागले आहेत. वैजापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे माजी नगराध्यक्ष दिनेश परदेशी यांचा अखेर आज मुंबईत मोतोश्रीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश झाला. काही माजी नगरसेवक, सरपंच, उपसरंपच यांना सोबत घेऊन परदेशी यांनी हातात मशाल घेतली आहे.

राष्ट्रवादीतून दोन वर्षापुर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलेले माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्याऐवजी परदेशी यांना पक्षात घेऊन विधानसभेची उमेदवारी द्या, असा आग्रह पक्षाच्या काही स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांनी शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्या मार्फत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे धरला होता. 15 सप्टेंबरचा मुहूर्त ठरवत स्वतः उद्धव ठाकरे परदेशी यांच्या पक्षप्रवेशासाठी वैजापूरमध्ये आले होते. परंतु भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केल्यानंतर दिनेश परदेशी यांनी आपला निर्णय बदलला होता.

दरम्यान, परदेशी हे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसात प्रवेश करा, नाहीतर विषय संपवा, असे स्पष्ट शब्दात बजावल्यामुळे आज पितृपक्षातच दिनेश परदेशी यांचा घाईघाईने पक्ष प्रवेश करून घेण्यात आला. मुंबईत उद्धव ठाकरे यांनी परदेशी यांच्यासह त्यांच्या समर्थकांच्या हातात शिवबंधन बांधले.

Dinesh Pardeshi Vaijapur News
Uddhav Thackeray : भाजप नेत्यानं शिवसेनेत प्रवेश करताच 'बाजारबुणगे' म्हणत ठाकरेंचा अमित शाहांवर हल्लाबोल

अंबादास दानवे यांच्या पुढाकारातून राजू शिंदे यांच्यानंतर आणखी एका नेत्याचा पक्ष प्रवेश करून घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने भाजपला दणका दिला आहे. (Shivsena UBT) वैजापूर नगर परिषदेत भाजपकडून नगरसेवक, काँग्रेसकडून नगराध्यक्ष, दोन वेळा विधानसभा आणि त्यानंतर पुन्हा भाजपकडून पत्नीला नगराध्यक्ष केल्यानंतर दिनेश परदेशी यांनी भाजप-काँग्रेस-भाजप आणि आता शिवसेना असा प्रवास केला. परदेशी यांच्या रुपाने शिवसेनेला विद्यमान आमदार प्रा. रमेश बोरनारे यांच्याविरोधात तगडा उमेदवार मिळाल्याची चर्चा आहे.

वैजापूर विधानसभा मतदारसंघातील शहरात दिनेश परदेशी यांचा चांगला जनसंपर्क आहे. 2014 मध्ये दिनेश परदेशी यांनी काँग्रेसकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. तेव्हा त्यांना 41 हजार मते मिळाली होती. शिवसेना-भाजप प्रमाणेच काँग्रेस-राष्ट्रवादी वेगळी लढल्याचा फटका त्यांना बसला होता. राष्ट्रवादीचे भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी तेव्हा विजय मिळवला होता.

Dinesh Pardeshi Vaijapur News
Shivsena Political News : ठाकरेंच्या शिवसेनेत राजकीय वातावरण ढवळून काढणाऱ्या नेत्यांची वानवा?

दिनेश परदेशी यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली जाणार याचा अंदाज आल्यामुळेच चिकटगांवकर यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. परदेशी यांच्या पक्षप्रवेशाकडे चिकटगावकर यांचेही लक्ष लागून होते. परदेशी यांचा अधिकृत पक्ष प्रवेश झाल्यानंतर आता चिकटगावकर पुन्हा शरद पवारांच्या छत्रछायेखाली जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांच्याशी चिकटगावकर यांची या संदर्भात चर्चा झाली आहे.

शरद पवारांकडून हिरवा कंदील आणि उमेदवारीचा शब्द मिळाला तर चिकटगावकर तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे. वैजापूरची जागा पुर्वीपासून युतीत शिवसेनेकडे आहे. आता महाविकास आघाडीत पहिला दावा हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच असणार आहे. पण काही मतदारसंघात अदलाबदल केली जाऊ शकते, ही शक्यता लक्षात घेता भाऊसाहेब पाटील चिकटगावकर आशा बाळगून आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com