CM Eknath Shinde Meet Jarange : अखेर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री मनोज जरांगे यांची भेट घेणार; अंतरवालीकडे रवाना...

Eknath Shinde &n Ajit Pawar Meet Manoj Jarange Patil : थोड्याच वेळात ते छत्रपती संभाजीनगर विमानतळावर पोहाेचतील.
CM Eknath Shinde Meet Jarange :
CM Eknath Shinde Meet Jarange :Sarkarnama

Jalna News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज मराठा आंदोलकांची भेट घेणार आहेत. सकाळी १०.०० वाजता मुख्यमंत्री मराठा आंदोलकांना भेटणार आहेत. थोड्याच वेळात ते छत्रपती संभाजीनगर विमानतळावर पोहाेचतील. मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, मंत्री चंद्रकांत पाटील हेसुद्धा आंदोलनस्थळी दाखल होणार आहेत.

अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मागील १६ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू आहे. काल सोळाव्या दिवशी या आंदोलानाला भेट देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार येणार होते. (Antarwali Sarati News) मात्र ऐनवेळी मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाला होता.

आधी सरकारकडून शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी जाणार आहे. त्यानंतर मी पुढचा निर्णय घेईन, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. आता अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपले सहकारी मंत्र्यांसह आंदोलकांच्या भेटीसाठी पोहाेचत आहेत.

(Edited By - Chetan Zadpe)

CM Eknath Shinde Meet Jarange :
Parbhani NCP News: परभणीत राष्ट्रवादीची घडी विस्कटली; पुढे आणखी धक्के बसणार...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com