Maratha Vs OBC : ओबीसी नेते बबनराव तायवडेंवर अखेर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण ?

Babanrao Taywade : सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास ओबीसी नेत्यांचा विरोध
Babanrao Taywade
Babanrao TaywadeSarkarnama

Hingoli Political News : आमच्या पंगतीत येण्याचा प्रयत्न केला तर हात पाय तोडू, अशी मराठा समाजाला उद्देशून बोलणाऱ्या ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोलीतील ओबीसी महाएल्गार सभेत चिथावणीखोर भाषण केल्याचा तायवडेंवर ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी सकल मराठा समाजाच्या वतीने हिंगोली पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले होते. त्याची दखल घेत पोलिसांनी तायवडेंवर कारवाई केली आहे. यामुळे राज्यातील वातावरण चिघळण्याची शक्यता आहे.

राज्यात आरक्षण मिळण्यासाठी मराठा तर आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी समाज आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. मराठा समाजामध्ये आरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटलांनी राज्यभर दौरे सुरू केले आहेत. त्यांच्या ठिकठिकणी मोठ्या सभा झाल्या. याला उत्तर म्हणून ओबीसी समाजाच्या वतीनेही महाएल्गार सभांचे आयोजन केले गेले.

Babanrao Taywade
Madha : उपसरपंचपद देण्याचे स्वप्न रात्रीतच कोसळले...; फोडाफोडीचे पडसाद ग्रामपंचायत निवडणुकीतही...

पहिली एल्गार सभा मराठा आंदोलनाच्या होमग्राउंड असलेल्या अंबड तर दुसरी हिंगोली येथे पार पडली. या दोन्ही सभांमध्ये ओबीसी नेत्यांनी आक्रमक भूमिका मांडल्याने राज्याचे वातावरण ढवळून निघाले. ओबीसी नेते, मंत्री छगन भुजबळांना राज्यभर मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. परिणामी राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरू झाल्याचा भास निर्माण झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, हिंगोलीतील सभेत कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी आरक्षणात सहभागी होण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर त्यांचे हात पाय कलम करण्याची भाषा ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवडे यांनी वापरली होती. यामुळे राज्यभर मराठा समाज आक्रमक झाला. ओबीसी नेते चिथावणीखोर शब्द वापरून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मराठा नेत्यांनी केला. या प्रकरणी सकल मराठा समाजाच्या वतीने हिंगोल पोलिसांकडे कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार तायवडेंवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

हिंगोलीतील सभेनंतर राज्यातून टीकेची झोड उठली होती. याची जाणीव ठेवून तायवडे यांनी मी माझे शब्द मागे घेतो, असेही एका खासगी वृत्तवाहिनीला सांगितले होते. तायवडे म्हणाले, मनोज जरांगेंनी भावनेच्या भरात दुसऱ्या समाजासाठी लायकी शब्द वापरला होता. त्यांनी तो मोठ्या मनाने मागे घेतला असेल तर मीही माझे अपशब्द मागे घेतो. ही लढाई वैचारिक आहे. त्यामुळे कुणीही वाद वाढवू नये, असे आवाहनही तायवडेंनी केले होते.

(Edited by Sunil Dhumal)

Babanrao Taywade
Ahmednagar Crime News : पोलिस ठाण्याच्या आवारातच 'ढिशुम-ढिशुम'; उपसरपंचाला मारहाण...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com