Devendra Fadnavis News : पाच टर्म आमदार असलेल्या नेत्याने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; नव्या चर्चेला उधाण

Political News : सध्या जिल्ह्याच्या राजकारणातील सस्पेन्स मात्र कायम आहे. एकीकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची लगबग सुरू आहे. त्यासाठी मातब्बर नेतेमंडळी हजेरी लावत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेशाची चर्चा आहे.
Madhukar chavan, Devendra Fadnavis
Madhukar chavan, Devendra FadnavisSarkarnama

Dharashiv News : धाराशिव लोकसभा मतदारसंघातील निवडणूक तोंडावर आली असताना जिल्ह्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यामुळे सध्या जिल्ह्याच्या राजकारणातील सस्पेन्स मात्र कायम आहे. एकीकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची लगबग सुरू आहे. त्यासाठी मातब्बर नेतेमंडळी हजेरी लावत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेशाची चर्चा आहे, तर दुसरीकडे बंडखोरी थोपविण्याचे आव्हान महायुतीमधील दिग्गज मंडळींवर असणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष या सर्व घडामोडीकडे लागले आहे.

मंगळवारी महायुतीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर (Omprakash Rajenimbalkar)यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya thackeray), राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar), काँग्रेसचे नेते तथा आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) यांच्या उपस्थितीत होते. यानंतर ठाकरे गटाची जाहीर प्रचार सभा झाली. या सभेत आदित्य ठाकरे यांनी जोरदार भाषण करीत उपस्थितांचे लक्ष वेधले. या वेळी त्यांनी शिंदे-फडणवीस-पवार यांच्या महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला.

Madhukar chavan, Devendra Fadnavis
Lok Sabha Election 2024: अजितदादांचा व्हिडिओ पोस्ट करत रोहित पवारांचा गंभीर आरोप, म्हणाले; " हा तर आचारसंहितेचा भंग..."

या सगळ्या कार्यक्रमास तुळजापूर तालुक्यातील माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण मात्र गैरहजर होते. त्यामुळे चर्चा रंगली होती. त्यातच ते सोलापूरला गेले असल्याचे समजले. या वेळी त्यांनी सोलापुरातील महायुतीच्या उमेदवारांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे फोटो प्रसार माध्यमांवर व्हायरल झाल्याने हा संपूर्ण तुळजापूर मतदारसंघात चर्चेचा विषय झाला होता.

याबाबत लगेचच काही जणांनी अफवाही पसरवली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली होती. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील काँग्रेसमधील दिग्ग्ज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री बसवराज पाटील, माजी केंद्रीयमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सूनबाई अर्चना पाटील यांनी काँग्रेसला बाय-बाय करीत भाजपला जवळ केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचा कोणताही नेता भाजपच्या नेत्यासोबत दिसल्यानंतर लगेचच नेत्याच्या प्रवेशाच्या चर्चा सुरू होतात. त्यातच मंगळवारी महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमाला मधुकर चव्हाण गैरहजर होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतचा भेटीचा फोटो व्हायरल झाल्याने दिवसभर या नव्या चर्चेला उधाण आले होते.

दरम्यान, ही चर्चा जोरात सुरू असल्याचे पाहून काँग्रेसच्या काही नेत्यांनी लगेचच या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट झाली. परंतु काही जणांनी मी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर टाकल्या आहेत. त्यामुळे जनतेमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतो. मी काँग्रेसमध्येच असून, यापुढेही काँग्रेस पक्षामध्येच राहणार असल्याचे माजी मंत्री मधुकर चव्हाण यांनी सांगितले आहे.

R

Madhukar chavan, Devendra Fadnavis
Devendra Fadanvis : नवनीत राणा आमच्या कार्यक्रमात आल्या, तर त्यात नवल काय?

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com