Vijay Wadettiwar : 'महायुतीचा एकच मंत्र, काम कमी हेच तंत्र'; विजय वडेट्टीवारांची फटकेबाजी

Vijay Wadettiwar criticized the mahayuti government over the Marathwada development package : मराठवाड्याच्या विकाससासाठी महायुती सरकारने गेल्यावर्षी केलेल्या घोषणांना उजाळा देताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर टीका केली.
Vijay Wadettiwar : 'महायुतीचा एकच मंत्र, काम कमी हेच तंत्र'; विजय वडेट्टीवारांची फटकेबाजी
Published on
Updated on

Mumbai News : मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाचा अमृत महोत्सव साजरा झाला. गेल्या वर्षी या दिनी महायुती सरकारनं मोठा गाजावाजा करत मराठवाड्यातील जिल्ह्यांसाठी 45 हजार कोटींची घोषणा केली. पण, प्रत्यक्षात मराठवाड्याच्या झोळीत 701 कोटी पडले. यावरून काँग्रेस नेते तथा विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारविरोधात जोरदार फटेकबाजी केली.

'प्रसिद्धीसाठी महायुतीचा एकच मंत्र, घोषणा मोठ्या काम कमी हेच तंत्र', अशी टोलेबाजी विजय वडेट्टीवार यांनी यांनी महायुती सरकाविरोधात केली आहे.

काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गेल्यावर्षी महायुती सरकारने वाजत-गाजक कॅबिनेट बैठकीत मराठवाड्यातील जिल्ह्यांसाठी घेतलेल्या निर्णयाची आठवण करून महायुती सरकारवर टीकास्त्र सोडलं. मराठवाड्यातील विकासासाठी महायुती सरकारनं 45 हजार कोटींची घोषणा केली होती.

तशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं. या घोषणेला एक वर्ष झालं. प्रत्यक्ष मराठवाड्याला किती मिळाले आणि महायुतीनं किती कोटीला फसवलं? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला. यासंदर्भात वडेट्टीवार यांनी त्यांच्या 'एक्स' खात्यावर पोस्ट शेअर केली आहे.

Vijay Wadettiwar : 'महायुतीचा एकच मंत्र, काम कमी हेच तंत्र'; विजय वडेट्टीवारांची फटकेबाजी
Maratha Reservation : आरक्षण घेणारच! मध्यरात्रीपासून मनोज जरांगेंचे उपोषण सुरू

किती कोटीने फसविले?

विजय वडेट्टीवार (Congress) यांनी महायुती सरकारने केलेल्या घोषणाला एक वर्ष झालं आहे. यात मराठवाड्याला मिळाले किती, तर फक्त 701 कोटी! मराठवाडा भागात पाण्यासाठी स्वतंत्र 14 हजार 40 कोटींची घोषणा केली होती, त्यात मिळाले फक्त 61 कोटी! आता मराठवाड्यातील जनतेने हिशोब करून अंदाज घ्यावा की, महायुती सरकारनं त्यांना किती कोटीने फसविले? यात महाराष्ट्राला देखील किती चुना लावत आहेत, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केलाय.

Vijay Wadettiwar : 'महायुतीचा एकच मंत्र, काम कमी हेच तंत्र'; विजय वडेट्टीवारांची फटकेबाजी
Uddhav Thackeray And CJI DY Chandrachud : 'गणपती बाप्पाला पुढची तारीख दिली नाही, हेच नशीब'; 'त्या' भेटीवर 'ठाकरी' चिमटा

पॅकेजपैकी फक्त 2 टक्के अंमलबजावणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्यावर्षी राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर मराठवाड्यासाठी जाहीर केलेल्या 45 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजपैकी केवळ 174 कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. बाकीचे सगळे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. साधारणत: एकूण पॅकेजपैकी फक्त 2 टक्के अंमलबजावणी झाल्याचे दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com