Raosaheb Danve : असंगाशी संग केल्याने शिवसेनेची दुरावस्था..

सत्ता आणि मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेने जनतेचा विश्वासघात करत राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसशी युती करून सरकार स्थापन केले. हे शिवसेनेच्या आमदारांना आणि राज्यातील लाखो जनतेला देखील पटले नव्हते. (Bjp)
Minister Raosaheb Danve-Cm Uddhav Thackeray
Minister Raosaheb Danve-Cm Uddhav ThackeraySarkarnama

औरंगाबाद : शिवसेना पक्षात उभी फूट पडून जी दुरावस्था झाली आहे, त्याला स्वतः शिवसेना जबाबार असून असंगाशी संग केल्याचा हा परिणाम असल्याची टीका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केली. औरंगाबाद येथे प्रसार माध्यमांशी बोलतांना दानवे यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केले.

शिवसेनेत (Shivsena) जे बंड झाले आहे, त्यात भाजपचा काहीही संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. एकनाथ शिंदे यांच्यासह ४० हून अधिक आमदार आणि अपक्षांनी पुकारलेल्या बंडाचा आज पाचवा दिवस आहे. (Maharashtra) मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थान सोडले असले तरी पदाचा अद्याप राजीनामा दिलेला नाही. तिकडे शिंदे गट आणखी आक्रमक होऊन सत्ता स्थापनेसाठी हालचाली करू लागला आहे.

तर इकडे राज्यात महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार, संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बंड मोडून काढण्यासाठीच्या कायदेशीर बाबींचा अभ्यास करत आहेत. गेल्या पाच दिवसांपासून राज्यातील कारभार ठप्प झाला आहे. या सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून असलेल्या आणि पडद्यामागून सूत्र हलवणाऱ्या भाजप नेत्यांनी आता यावर भाष्य करण्यास सुरुवात केली आहे.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या परिस्थिततीला शिवसेनाच जबादार असल्याचे म्हटले आहे. दानवे म्हणाले, असंगाशी संग केल्याने काय होणार ते आज संपुर्ण राज्यातील जनता पाहत आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील मतदारांनी शिवसेना-भाजपला स्पष्ट बहुमत दिले होते. पण सत्ता आणि मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेने जनतेचा विश्वासघात करत राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसशी युती करून सरकार स्थापन केले.

Minister Raosaheb Danve-Cm Uddhav Thackeray
अजितदादा मुख्यमंत्र्यांना जुमानत नव्हते... आम्ही काय करायचे... महेश शिंदेंची खदखद

हे शिवसेनेच्या आमदारांना आणि राज्यातील लाखो जनतेला देखील पटले नव्हते. त्यामुळे जरी हे तीन पक्षांचे सरकार अडीच वर्ष टिकले तरी ते एक दिवस अंतरविरोधाने कोसळणार हे आम्ही सांगत होतो. पण आम्ही सरकार पाडणार असा आरोप सातत्याने महाविकास आघाडीचे नेते करत होते. तीन पक्षातील नेते, आमदारांमध्ये समन्वय नव्हता.

आमदारांची कामे होत नव्हती, त्यांनी निधी मिळत नव्हता हे आम्ही नाही तर त्यांचेच आमदार आज सांगत आहेत. त्यामुळे असंगाशी संग केल्याची मोठी किमंत शिवसेनेला आज मोजावी लागते आहे. भाजपचा याच्याशी काहीही संबंध नाही. आमच्याकडे कोणी सरकार स्थापन करायचा प्रस्ताव घेऊन आलेले नाही किंवा आम्ही त्यांना बोलावलेले नाही, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com