अजितदादा मुख्यमंत्र्यांना जुमानत नव्हते... आम्ही काय करायचे... महेश शिंदेंची खदखद

शिवसेनेच्या shivsena मतदारसंघात आम्ही ज्यांना पाडले आहे. त्यांना आमच्या डबल, तिब्बल निधी विकास कामांसाठी मुख्यमंत्री CM office कार्यालयातून दिला गेला होता.
Shivsena MLA Mahesh Shinde
Shivsena MLA Mahesh Shindesarkarnama
Published on
Updated on

सातारा : शिवसेनेच्या आमदारांना कमी निधी तर राष्ट्रवादीच्या नेत्यांना मोठ्याप्रमाणात निधी दिला जात होता. मुख्यमंत्र्यांनी एखाद्या बाबीला स्थगिती दिली तर उपमुख्यमंत्री अजित पवार या स्थगिती आदेशाला केराची टोपली दाखवत होते. महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहणे आणि दुसऱ्या बाजूला आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केले जात होते. या रागापोटी आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत, अशी माहिती कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी दिली आहे.

आमदार शिंदे यांनी गुहाटी येथून सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल केला आहे. यामध्ये त्यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची नेमकी भूमिका मांडली आहे. तसेच राष्ट्रवादीकडून शिवसेनेच्या आमदारांसह मुख्यमंत्र्यांवर कशापध्दतीने अन्याय होत होता, याचाही गौप्यस्फोट केला आहे.

Shivsena MLA Mahesh Shinde
रस्त्याच्या निकृष्ठ कामावरून महेश शिंदे भडकले; ठेकेदाराला धरले धारेवर....

महेश शिंदे म्हणाले, मागे शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक वर्षा निवासस्थानी झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला तुम्हाला किती निधी मिळाला याची माहिती घेतली. त्यानंतर अधिकाऱ्यांकडून शिवसेनेच्या आमदारांना किती निधी दिला याची माहिती घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्यापुढे चुकीचे आकडे दिले गेले. तर आमदारांनी खरे आकडे सांगितले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना खडसावत तुम्ही आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आमचा विश्वासघात केला आहे. तरीही या अधिकाऱ्यांत काहीही बदल झाला नाही.

Shivsena MLA Mahesh Shinde
'किसन वीर'चा जरंडेश्‍वर करण्याचा डाव मोडून काढा...महेश शिंदे

महेश शिंदे म्हणाले, शिवसेनेच्या आमदारांना ५० ते ५५ कोटींचा निधी दिला होता. तर राष्ट्रवादीच्या आमदारांना ७०० ते आठशे कोटींचा निधी दिला जात होता. शिवसेनेच्या मतदारसंघात आम्ही ज्यांना पाडले आहे. त्यांना आमच्या डबल, तिब्बल निधी विकास कामांसाठी मुख्यमंत्री कार्यालयातून दिला गेला होता. मधल्या काळात आम्हाला निधी दिला गेला. पण, आम्हाला कुठल्याही कार्यक्रमाला बोलावले जात नव्हते.

Shivsena MLA Mahesh Shinde
पुन्हा एक धक्का : भाजपची युती होणार राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत ?

या सर्व खदखदीबाबत आमच्या मुख्यमंत्र्यांसोबत तीन बैठका झाल्या. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला होता की यामध्ये सुधारणा होईल. मात्र, तसे झाले नाही. मुख्यमंत्र्यांनी काही प्रकरणांना स्थगिती (स्टे) दिली होती. पण, उपमुख्यमंत्र्यांनी ही स्थगिती मानली नाही. मुख्यमंत्र्यांच्या स्थगितीला केराची टोपली दाखवली. तसेच आमच्या मतदारसंघात विरोधकांची विकास कामे करून उद्‌घाटने घेतली. अशा पध्दतीचे काम सातत्याने चालू राहिले.

Shivsena MLA Mahesh Shinde
कृषीमंत्री दादा भुसेंना एकनाथ शिंदे यांनीच ठाकरे गोटात ठेवले होते?

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शिवसेनेच्या आमदारांच्या प्रत्येक मदतारसंघात आले. त्यावेळी त्यांनी पुढचा येणारा आमदार राष्ट्रवादीचाच होईल, शिवसेनेचा आमदार या मतदारसंघात दिसणार नाही, असे जाहीर केले होते. ही सर्व बाबी आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगत होतो. पण, यातील कोणतीही गोष्ट थांबली नाही. अशा परिस्थितीत काम करणे अशक्य होते. राष्ट्रवादीकडून आम्हाला पाडण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले जात होते. महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहिणे आणि दुसऱ्या बाजूला आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम हा पक्ष करत होता. या रागपोटी आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com