BJP Politics : CM फडणवीसांनी बांगलादेशी घुसखोरांविरोधात युद्ध छेडलं अन् किरीट सोमय्या 'अ‍ॅक्शन मोड'वर...

BJP leader Kirit Somaiya in Amravati : अमरावतीच्या अंजनागाव सुर्जी तहसीलदार कार्यालयात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हजेरी लावली.
Devendra Fadnavis | Kirit Somaiya
Devendra Fadnavis | Kirit Somaiya Sarkarnma
Published on
Updated on

Mumbai News : शिर्डी इथल्या भाजपच्या कालच्या महाविजय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांवर निवडणुकीत अराजकतावादी शक्तींचा वापर केल्याचा आरोप करताना मालेगाव आणि अमरावतीमधील अंजनगावचा संदर्भ दिला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यावर काम करत आहेत, असे म्हणताना बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध युद्ध तीव्र करणार असल्याचा इशारा दिला. या इशाऱ्यानंतर 12 तासातच भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या 'अ‍ॅक्शन मोड'वर आले असून, अमरावती जिल्ह्यात अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयात जात झाडाझडती घेतली.

भाजपचे (BJP) माजी खासदार किरीट सोमय्या आज अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जीमध्ये दाखल झाले. तिथं अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयातील तहसीलदार पुष्पा सोळंके यांच्यासोबत किरीट सोमय्या यांची बैठक झाली. अंजनगाव सुर्जीमध्ये तब्बल 1100 रोहिंग्या बांगलादेशी लोकांना बनावट जन्म दाखले दिल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

Devendra Fadnavis | Kirit Somaiya
Samta Parishad : छगन भुजबळांची समता परिषद 'इलेक्शन मोड'वर; अजितदादांसह महायुतीचं टेन्शन वाढवलं

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी महाराष्ट्रात बांगलादेशवरून 2200 कोटी आले होते. त्यापैकी 319 कोटी रुपये बांगलादेशी रोहिंग्यांना जन्माच्या दाखल्यासाठी हे पैसे खर्च करण्यात आल्याचा आरोप केला आहे. अमरावतीच्या अंजनगावमधघ्ये रोहिंग्यांना बनावट जन्म दाखल देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. हा गंभीर प्रकार कार्यकर्त्यांनी लक्षात आणू दिल्याचा दावा देखील किरीट सोमय्या यांनी केला.

Devendra Fadnavis | Kirit Somaiya
Ashok Chavan News : पंकजा मुंडे नांदेडच्या पालकमंत्री? चर्चा आहे! खासदार चव्हाण म्हणाले, तो फार मोठा विषय नाही…

अंजनगाव सुर्जी साठ हजार लोकसंख्येची नगरपरिषद असून, या ठिकाणी 20 हजार मुस्लिम आहेत. तर 1400 लोकांचे जन्म दाखल्यासाठी अर्ज आले आहेत. यात जन्माचे दाखले 98% बांगलादेशीं आहेत. निवडणूक आचार संहिता काळात हा प्रकार झाल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला. त्यामुळे प्रत्येकाची चौकशी होणे गरजेची आहे. बांगलादेश रोहिंग्यांना बसमध्ये भरून बांगलादेशमध्ये पाठवणार असेही किरीट सोमय्या यांनी म्हटले.

मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले होते

भाजप अन् पंतप्रधान नरेंद मोदी यांना निवडणुकीत पराभूत करता येत नाही, हे लक्षात आल्यावर महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष यांनी अपप्रचार, अराजक शक्तींना बळ दिले. अचानक शेकडो लोकांना जन्मदाखले घेतले. बांगलादेशी घुसखोर कागदपत्रे तयार केली. पुढचं युद्ध हे अराजकतावादी शक्तींविरोात, बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध तीव्र होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com