Chhatrapati Sambhajinagar News : घोटाळा आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेना व सगळ्याच पक्षातील अनेक नेत्यांना गेल्या तीन-चार वर्षांमध्ये भाजपामध्ये प्रवेश देण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. भाजपाकडे नेत्यांना स्वच्छ करून घेण्याचे वॉशिंग मशीन असल्याचा टोलाही लगावला जातो.
अशातच छत्रपती संभाजीनगरमधील अजिंठा अर्बन बँकेच्या घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि बँकेचे अध्यक्ष असलेले माजी काँग्रेस (Congress) आमदार सुभाष झांबड यांनीही घोटाळ्यातून वाचण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या पंधरा महिन्यांपासून पोलिसांच्या रेकॉर्डवर फरार असलेले झांबड दरम्यानच्या काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल्याचे बोलले जाते.
लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर झांबड यांनी फडणवीस यांची भेट घेतली होती. परंतु त्यांच्या पक्ष प्रवेशाला भाजप मधून विरोध झाल्याने हा प्रवेश होऊ शकला नाही, अशी माहिती आहे. (Scams) दुसरीकडे काँग्रेसने मात्र सुभाष झांबड यांच्यावर बँकेतील 98 कोटींच्या घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतरही कुठलीही कारवाई केली नाही. सध्याही सुभाष झांबड हे काँग्रेसमध्येच आहेत.
अटक झाल्यानंतर आता काँग्रेस पक्षातून त्यांची हकालपट्टी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुभाष झांबड यांनी 2019 मध्ये काँग्रेस कडून छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. परंतु त्यांचे या निवडणुकीत डिपॉझिट जप्त झाले होते. दीड वर्ष अटकपूर्व जामीनासाठी झाबंड यांनी कोर्टाच्या खेट्या मारल्या. स्थानिक न्यायालयापासून ते उच्च न्यायालय, सुप्रीम कोर्टातही त्यांनी धाव घेतली.
परंतु त्यांना अटकपूर्व जामीन मिळाला नाही अन् तब्बल दीड वर्षानी सुभाष झांबड पोलिसांना शरण आले. ठेवीदारांची 97 कोटी 41 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यासह 14 संचालकावर गुन्हा दाखल झालेला आहे. नुकतेच प्रयागराज येथे कुंभमेळ्यात सुभाष झांबड यांनी स्नान करून पापक्षालन केले होते. मार्च 2016 ते ऑगस्ट 2023 या काळात अजिंठा अर्बन बँकेत 97.41 कोटींचा घोटाळा झाल्याची उघडकीस आले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.