सतीश चव्हाणांचा काँग्रेसला दे धक्का : तीन माजी नगराध्यक्षांचा एकाच दिवशी राष्ट्रवादीत प्रवेश

गंगापूरचे माजी नगराध्यक्ष संजय जाधव यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
Sanjay Jadhav and his associates joined  NCP
Sanjay Jadhav and his associates joined NCPSarkarnama

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाच्या विस्तारवाढीचे शिवधनुष्य हाती घेतले आहे. विधानसभेला पक्षाचा एकही आमदार निवडून आलेल्या औरंगाबाद जिल्ह्यावर पक्षाने विशेष लक्ष दिले असून पदवीधर आमदार सतीश चव्हाण (satish chavan) यांनी काँग्रेसला (congress) गंगापूरमध्ये धक्का दिला आहे. गंगापूरचे काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष संजय जाधव यांच्यासह तीन माजी नगराध्यक्ष व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज (ता. १० फेब्रुवारी) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (ncp) प्रवेश केला. (Former Gangapur Council chairman Sanjay Jadhav joins NCP)

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूरचे काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष संजय जाधव, पक्षाच्या पाच विद्यमान नगरसेवकांसह बाजार समितीच्या माजी संचालकांचा राष्ट्रवादी प्रवेशाचा सोहळा मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे पक्षाचे आमदार सतीश चव्हाण यांच्या पुढाकारातून हा पक्षप्रवेश झाला आहे.

Sanjay Jadhav and his associates joined  NCP
जामिनावर सुटताच नितेश राणे म्हणाले, मला अटक झालीच नाही!

संजय जाधव यांनी सलग १५ वर्षे गंगापूरचे नगराध्यक्षपद भूषविले आहे. तसेच, त्यांनी गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समिचे सभापती, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. सध्या ते गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत. गंगापूर नगरपालिकेतील काँग्रेसचे गटनेते सुरेश नेमाडे, नगरसेवक ज्ञानेश्वर साबणे, योगेश पाटील, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अशोक खाजेकर, नगरसेवक मोहसीन चाऊस, माजी नगरसेवक सचिन भवार, हासिफ बागवन यांच्यासह गंगापूर बाजार समितीचे सहा माजी संचालक, पंचायत समितीचे माजी सदस्य शारंधर जाधव, गंगापूर युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष उमेश बाराहाते यांच्यासह जाधव यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

Sanjay Jadhav and his associates joined  NCP
काँग्रेसला घ्यायचाय राष्ट्रवादीच्या आमदाराचा अभ्यास वर्ग

या प्रवेशाच्या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी ‘औरंगाबाद हे मराठवाड्याचे प्रवेशद्वार आहे. औरंगाबादमध्ये विधानसभेच्या नऊ जागा असून त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार निवडून आला नाही, ही आमची खंत आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादीचा आमदार निवडून येतो. मात्र, विधानसभेला एकही सदस्य निवडून येत नाही, याबाबत विचार करण्याची गरज आहे, अशी खंत व्यक्त केली.

Sanjay Jadhav and his associates joined  NCP
दोन वेळा तुरुंगात जाऊन आलात, आता तरी सुधरा! केसरकरांचा राणेंना शहाणपणाचा सल्ला

आमदार सतीश चव्हाण यांनी गंगापूरचे माजी नगराध्यक्ष जाधव यांच्या प्रवेशाबाबत मला सांगितले होते. मी आमदार चव्हाण यांना शब्द दिला होता की संजय जाधव यांच्या प्रवेशाच्या वेळी मी नक्की उपस्थित राहीन, त्यानुसार मी आज तुमच्यासमोर उभा आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या घरात एक शुभकार्य असल्यामुळे ते जाधव यांच्या पक्षप्रवेशावेळी उपस्थित राहू शकले नाहीत, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.

Sanjay Jadhav and his associates joined  NCP
जामीन मिळताच 24 तासांत 'आयसीयू'तील आमदार नितेश राणेंना रुग्णालयातून डिस्चार्ज

संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली गंगापूरचा विकास होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. आपल्यापुढे अनेक संकटे येतील. पण, त्यातून खचून जायचे नसते. त्या संकटातून पुढे जात असताना आपल्याला सर्वांना सोबत घेऊन काम करावे लागणार आहे. आगामी स्थानिक स्वराज संस्थांमध्ये राष्ट्रवादीला प्रथम स्थानावर आणायचे आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही पवार यांनी या वेळी केले.

आणखी काही नेते राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचे संकेत

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आपल्यासाठी महत्वाचा आहे. आपल्याला परभणी, औरंगाबाद यांसारख्या जिल्ह्यात अधिक लक्ष देण्याची गरज आहे. आगामी काळात आपल्याला बेरजेचे राजकारण करावे लागणार आहे. इतर पक्षांमधील लोक राष्ट्रवादीत येऊ पाहतात, त्याची चर्चा सुरू आहे. त्यानुसार ते प्रवेश होतील, असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com