सिंधुदुर्ग : शिवसेना (Shivsena) कार्यकर्ते संतोष परब हल्लाप्रकरणी भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. राणेंना जामीन मिळताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला होता. कार्यकर्त्यांनी कणकवलीतील शिवसेना शाखेसमोर फटाके वाजवले होते. यावरून शिवसेना आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी राणेंना शहाणपणाचा सल्ला देत चिमटे काढले आहेत. (Nitesh Rane News)
नितेश राणेंना जामीन मंजूर होताच कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला होता. कार्यकर्त्यांनी थेट कणकवलीत शिवसेना शाखेसमोरच फटाके फोडले. कणकवलीतील नरडवे नाका येथील शिवसेना शाखेसमोर भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत फटाके वाजवले. दरम्यान, नितेश राणे कोल्हापूरमधील सीपीआर रुग्णालयात दाखल होते. तेथेही जमून कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. टायगर अभी जिंदा है, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. यावरुन आमदार केसरकर यांनी राणेंनी दोन वेळा तुरुंगात जाऊन आल्यानंतर आता तरी सुधरावे, असा टोमणा मारला आहे. (Nitesh Rane Gets Bail)
आमदार केसरकर म्हणाले की, नेता आयसीयूत असताना कार्यकर्त्यांनी फटाके वाजवणे कितपत योग्य ठरते? आमदार नितेश राणे हे दोनदा तुरुंगात जाऊन आले आहेत. ते न्यायालयीन कोठडीतून बाहेर आले म्हणून फटाके वाजवणे चुकीचे आहेत. याचबरोबर नेत्याची तब्येत खालावल्याने तो आयसीयूमध्ये असताना कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने फटाके वाजवू नयेत. राणे हे तरुण आहेत. त्यामुळे ते आता तरी सुधारतील.
नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर काल (ता.8) जिल्हा न्यायालयात दोन्ही बाजूने युक्तिवाद करण्यात आला होता. पण न्यायालयाच्या कामकाजाची वेळ संपल्याने निकाल राखून ठेवण्यात आला होता. आज त्यावर झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने राणेंचा 30 हजार रुपयांचा जातमुचलक्यावर जामीन अर्ज मंजूर केला आहे. सरकार पक्षाकडून जामीन अर्ज फेटाळण्याची जोरदार मागणी करण्यात आली होती. अखेर राणेंना जामीन मंजूर झाला आहे.
काय आहे संतोष परब हल्ला प्रकरण?
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत हा प्रकार घडला होता. बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक व करंजे गावचे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर 2021 रोजी हल्ला झाला होता. परब हे दुचाकीवरून कनकनगर येथे जात असताना मागून येणाऱ्या नंबर प्लेट नसलेल्या इनोव्हा कारने त्यांना मागून धडक दिली होती. यानंतर परब रस्त्यावर पडल्यानंतर दोघांनी परब यांच्यावर टोकदार हत्याराने छातीवर वार केले होते. यात परब गंभीर जखमी झाले होते. राजकीय वादातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. जिल्हा बँक निवडणुकीच्या रणधुमाळीत झालेल्या या हल्ल्यामुळे खळबळ उडाली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.