Chhatrapati Sambhajinagar : काँग्रेस पक्षातून आपल्या राजकारणाला सुरवात करणारे राज्याचे माजी राज्यमंत्री अशोक पाटील डोणगावर यांचे शनिवारी (ता.5) निधन झाले. गेल्या आठ वर्षांपासून ते आजारी होते. सरपंच ते राज्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला. 1995 ते 97 या काळात शिवसेना भाजप युती सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते.
काँग्रेस (Congress) पक्षातून आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात करणारे अशोक पाटील डोणगावकर हे नंतर अपक्षांचे नेते म्हणून ओळखले जात होते. गंगापूर तालुक्यातील डोणगाव येथे 1945 मध्ये त्यांचा जन्म झाला. 1977 ते 80 या काळात गावचे सरपंच म्हणून ते कार्यरत होते. गंगापूर तालुक्यात भागीरथी शिक्षण संस्था व मुक्तेश्वर शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष होते. वाळुज गटातून ते जिल्हा परिषद सदस्य, त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि भूविकास बँकेचे संचालकही होते.
1980 मध्ये पहिल्यांदा गंगापूर मतदारसंघातून निवडणूक लढवली. इंदिरा काँग्रेस पक्षाकडून लढताना त्यांनी एस काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा पराभव केला होता. (Chhatrapati Sambhajinagar) 1995 मध्ये पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि दुसऱ्यांदा आमदार झाले होते. गंगापूर तालुक्यातील विकासात अशोक पाटील डोणगावकर यांचे मोठे योगदान होते. गंगापूर तालुक्यात 1983 मध्ये मुलींची शाळा सुरू केली होती.
नवख्या डोणगावकरांना इंदिरा गांधी दिली संधी..
गंगापूर विधानसभेची 1980 मध्ये झालेली निवडणूक काँग्रेस पक्षाने प्रतिष्ठेची केली होती. उमेदवारी कोणाला द्यायची यावरून पक्षात मोठा खल सुरू होता. महाराष्ट्रात काँग्रेसचे दोन तुकडे झालेले असताना गंगापूरमधून इंदिरा काँग्रेसच्या वतीने डॉ. बाबुराव पवार यांना उमेदवारी जाहीर झाली होती. परंतु एस काँग्रेसच्या उमेदवारापुढे त्यांचा टीकाव लागणार नाही, अशी माहिती तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना देण्यात आली.
त्यानंतर औरंगाबाद विमानतळावर इंदिरा गांधी यांनी आधी जाहीर केलेला उमेदवार बदलून अशोक पाटील डोणगावकर यांना उमेदवारी दिली होती. तेव्हा एस काँग्रेसच्या लक्ष्मण मनाळ यांचा पराभव करून ते विजयी झाले होते. त्यानंतर 1995 च्या विधानसभा निवडणुकीत अशोक पाटील डोणगावकर हे अपक्ष निवडून आले आणि दुसऱ्यांदा आमदार झाले. शिवसेना- भाजप युतीच्या सरकारमध्ये अशोक पाटील डोणगावकर यांना राज्यमंत्रीपद मिळाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.