Congress on Thackeray alliance : ठाकरे बंधू एकत्र आले, मुंबई निवडणुकीत आघाडीचं गणित बिघडणार? वर्षा गायकवाड म्हणाल्या, 'आघाडीच्या हालचाली...'

Congess Varsha Gaikwad on Thackeray Brothers Unity in Mumbai BMC Polls : मुंबई काँग्रेस अध्यक्ष तथा खासदार वर्षा गायकवाड यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यावर भूमिका मांडली.
Varsha Gaikwad
Varsha GaikwadSarkarnama
Published on
Updated on

BMC polls Varsha Gaikwad : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, विशेष करून मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याने राज्यात अनेक राजकीय उलथापालथी होत आहेत.

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यानंतर मुंबई महापालिका निवडणुकीत आघाडीत मोठे बदल होतील, असे संकेत देताच, मुंबई महापालिका निवडणुकीत आघाडीबाबत मोठा निर्णय होईल. मात्र अद्याप तरी कोणत्याही हालचाली नाही, असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष तथा खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले.

मुंबई काँग्रेस (Congress) अध्यक्ष तथा खासदार वर्षा गायकवाड यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यावर भूमिका मांडली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकत्र शक्तिप्रदर्शनाचे अन् दोघे भाऊ एकत्र आल्याचे काँग्रेसकडून खासदार गायकवाड यांनी स्वागत केले आहे.

खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या, "मुंबई (Mumbai) महापालिका निवडणुकीत आघाडी करायची की, स्वबळावर लढायचे याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतील; मात्र अद्याप त्याबत कोणत्याही हालचाली आता सुरू नाहीत". मुंबईत निवडणुकीचे वातावरण तयार होऊ लागले आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे भाऊ एकत्र असल्याचे काँग्रेसकडून त्याचे स्वागत करते, असेही वर्षा गायकवाड यांनी म्हटले.

Varsha Gaikwad
Trupti Desai News: मोठी बातमी: तृप्ती देसाईंच्या अडचणी वाढणार! गुन्हा नोंदवताच भाजप जिल्हाध्यक्षानं दिला मोठा इशारा

लोकसभा आणि विधानसभा महाविकास आघाडी म्हणून लढवल्या होत्या. आता महापालिका निवडणूक आल्याने या निवडणुकीत आघाडी होईल काय, यावर बोलताना, लोकसभा आणि विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढलो. तो प्रयोग काही प्रमाणात यशस्वी झाला; मात्र आता निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवायची की स्वबळावर लढायचे, याबाबत आमचे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असे स्पष्ट केले.

Varsha Gaikwad
BMC Election : सरकारने 'नाक' दाबलं; मुंबई महापालिका प्रचंड आर्थिक संकटात : आणखी 16 हजार कोटींच्या ठेवी मोडण्याची तयारी

मुंबई महापालिकेसाठी आमच्या मुंबईतील सर्व मतदारसंघांत मोर्चेबांधणी काँग्रेसकडून सुरू आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असताना मुंबईत महापालिकेच्या भूखंडांच्या पुनर्विकास कामाच्या अंतर्गत व इतर विकासकामांत सुरू असलेले घोटाळे, भ्रष्टाचार यांची दर आठवड्याला पोलखोल करणार असल्याचा निर्धार खासदार गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com