Marathwada Political News : बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार आर.टी. देशमुख यांचे गंभीर अपघातात निधन झाले आहे. औसा तालुक्यातील बेलकुंड जवळ सायंकाळी पावसामुळे देशमुख यांची कार स्लीप होऊन रस्त्याच्या शेजारी असलेल्या खड्ड्यात पडली. यामध्ये आर.टी.देशमुख यांना जबर मार लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. कारचा चालक आणि अंगरक्षक दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मराठवाड्यासह राज्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. भाजपचे (BJP) माजलगावचे माजी आमदार आज औसा तालुक्यातील बेलकुंड येथे आपल्या कारने जात असताना पावसाच्या पाण्यामुळे गाडी अचानक स्लीप झाली. गाडीचा वेग अधिक असल्याने कार रस्त्याच्या शेजारी असलेल्या खड्यात कोसळली.
या भीषण अपघातामध्ये आर.टी. देशमुख यांना जबर मार लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. (Beed News) घटनास्थळी लोकांनी धाव घेऊन गंभीर जखमी असलेल्या चालक आणि सुरक्षा रक्षकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. देशमुख यांच्या अपघाती निधनाची बातमी कळताच माजलगाव, बीडमध्ये शोककळा पसरली.
आर.टी.देशमुख यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरवात ही काँग्रेस पक्षातून केली होती. कालांतराने ते भाजपामध्ये दाखल झाले. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख होती. मुंडे यांच्या पश्चात पंकजा मुंडे यांच्याशीही देशमुख यांचे कौटुंबिक संबंध होते.
परळी पंचायत समिती सभापती म्हणून त्यांनी काम पाहिले होते. 2014 ते 19 दरम्यान, माजलगाव मतदार संघातून ते आमदार होते. भाजपाचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी सहा वर्षे काम केले होते. परळी तालुक्यातील मोहा या मुळगावचे असलेले आर.टी. देशमुख हे सामान्य कुटुंबातून राजकारणात आले होते. त्यांच्यावर यापूर्वी लिव्हर चेंज सर्जरीही करण्यात आली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.