BJP, Shinde Sena strategy: मुंबईत ठाकरेंना बालेकिल्ल्यातच घेरण्याचे प्लॅनिंग; भाजप, शिंदेसेना ताकद दाखवण्यासाठी मोठा डाव टाकणार

Thackeray Mumbai politics News : शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असल्याने मुंबई महापालिका निवडणुकीत काय होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
Uddhav Thackeray Eknath shinde Devendra Fadnavis
Uddhav Thackeray Eknath shinde Devendra Fadnavis sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबई महापालिका निवडणुकीत गेल्यावेळी भाजपचे सत्ता मिळवण्याची संधी थोडक्यात हुकली होती. भाजपने 82 जागा जिंकल्या होत्या. तर दुसरीकडे 2017 मध्ये एकसंध शिवसेनेनं मुंबई महापालिकेत 84 जागा जिंकल्या होत्या. भाजपपेक्षा दोन जागा जास्त जिंकणाऱ्या शिवसेनेने त्यावेळी पुन्हा एकदा बाजी मारत सत्ता मिळवली होती.

शिवसेनेने त्यानंतर मनसेचे 6 नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश दिला. त्यामुळे सेनेच्या नगरसेवकांचा आकडा 90 वर पोहोचला होता. तर काही अपक्ष नगरसेवकांना हाताशी धरत मुंबई महापालिकेवर भगवा फडकावला होता. गेल्या तीन वर्षाच्या काळात बरेच बदल झाले आहेत. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असल्याने मुंबई महापालिका निवडणुकीत काय होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

मुंबई महापालिकेवर सत्ता आणण्याची भाजपची (BJP) संधी थोडक्यात हुकली. यंदा मात्र भाजपला ती संधी सोडायची नाही. तर दुसरीकडे भाजपच्या तोडीस तोड नगरसेवक निवडून आणत मुंबईत ताकद दाखवण्यासाठी शिंदेसेना उत्सुक आहे.मुंबई महापालिकेत घवघवीत यश मिळवून ठाकरेंना त्यांच्याच बालेकिल्ल्यात शह देऊन त्यांचं राजकारण अधिक अडचणीत आणण्याचा शिंदेंचा प्रयत्न आहे.

यासोबतच त्यांना भाजपलाही आपली ताकद दाखवून द्यायची आहे. भाजप आणि शिंदे गटाचा ‘मुंबईवर वर्चस्व’ मिळवण्याचा दीर्घकालीन डावाचा हा भाग असणार आहे. शिवसेनेच्या वादामुळे निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीचा फायदा उठवून ठाकरे गटाच्या गडांमध्येच त्यांना घेरण्याचे नियोजन महायुतीकडून सुरु आहे.

Uddhav Thackeray Eknath shinde Devendra Fadnavis
Eknath Shinde Politics: जिथे जिथे कोट्यावधींची रोकड, तिथे तिथे एकनाथ शिंदेंचे समर्थक, योगायोग की...

गेल्या काही दिवसापासूनच शिंदेसेनेने आगामी काळात होत असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्या माध्यमातूनच ठाकरेसेनेचे अधिकाधिक नगरसेवक गळाला लावण्यास सुरुवात केली आहे. 2017 मध्ये एकसंध शिवसेनेनं (Shivsena) मुंबई महापालिकेत 84 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर मनसेचे 6 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे सेनेच्या नगरसेवकांचा आकडा 90 वर पोहोचला आहे. यातील निम्म्याहून अधिक नगरसेवक आता शिंदेकडे आले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसात शिंदेंची ताकद चांगलीच वाढली आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसापासून शिंदे सेनेने रणनीती आखली आहे.

Uddhav Thackeray Eknath shinde Devendra Fadnavis
NCP News : एकत्रीकरणाला अजित पवारांचा पक्ष राजी होईल?

मुंबई महापालिकेची निवडणूक 2022 पासून प्रलंबित आहे. आता आगामी महापालिका निवडणूक पाहता माजी नगरसेवकांना विकासकामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याची तयारी शिंदेसेनेने केली आहे. पालिकेच्या माध्यमातून 2 कोटींपर्यंतची कामं, तसंच नगरविकास विभाग, जिल्हा नियोजन विकास समिती (डीपीडीसी) आणि म्हाडामार्फतही निधी उपलब्ध करुन देण्याचं आश्वासन नगरसेवकांना देण्यात आलं आहे. त्यामुळे शिंदे सेनेकडे मोठ्या प्रमाणात इनकमिंग वाढले आहे. जवळपास 45 ठाकरे सेनेच्या नगरसेवकानी शिंदे सेनेत प्रवेश केला आहे.

Uddhav Thackeray Eknath shinde Devendra Fadnavis
Maharshtra Assembly Election: धाकधूक वाढली; अंतिम आकडेवारीनुसार राज्यातील 'या' दहा मतदारसंघात सर्वाधिक मतदान

विकासकामांसाठी निधी देऊन निवडणुकीच्या तोंडावर माजी नगरसेवकांना ताकद देण्याचे प्रयत्न शिंदेसेनेकडे केले जात आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खाते आहे. याशिवाय मुंबई शहराचे पालकमंत्रिपदही त्यांच्याकडेच आहे. शिंदे यांच्याकडे असलेल्या खात्यांमधून माजी नगरसेवकांना विकास निधी देऊन त्यांची ताकद वाढवण्याची रणनीती आखण्यात आलेली आहे. या माध्यमातून शिंदेसेना निवडणुकीच्या आधी राजकीय सामर्थ्य वाढवत आहे. त्याचा फायदा येत्या काळात होत असलेल्या महापालिका निआवडणुकीत होईल असे त्यांना वाटत आहे.

Uddhav Thackeray Eknath shinde Devendra Fadnavis
Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance: एकत्र येणे, हा उद्धव-राज ठाकरेंसमोरील अखेरचा पर्याय

गेल्या निवडणुकीत मुंबईत भाजपने 82 जागा जिंकल्या होत्या. मुंबई महापालिकेवर सत्ता आणण्याची भाजपची संधी थोडक्यात हुकली. यंदा मात्र भाजपला ती संधी सोडायची नाही असे ठरवले आहे. त्यामुळेच भाजपने देखील काँग्रेसचे नगरसेवक गळास लावण्यास सुरुवात केली आहे . त्यामुळेच ठाकरेंना त्यांच्याच बालेकिल्ल्यात घेरण्याची संधी भाजप, शिंदे सेनेकडे चालून आली आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष त्याकडे लागून राहिले आहे.

Uddhav Thackeray Eknath shinde Devendra Fadnavis
Thackeray brothers reunion : उद्धव-राज ठाकरे एकत्र येणार की नाही? संजय राऊतांनी दिले मोठे संकेत, थेटच म्हणाले, 'पडदा...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com