परभणी : राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) परभणी (Parbhani) जिल्ह्यातील नेते, माजी खासदार ॲड. सुरेश जाधव (Suresh Jadhav) यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा गुरुवारी (ता. २८ जुलै) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याकडे पाठविला आहे. जाधव हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाधव यांनी पक्ष सोडणे राष्ट्रवादीसाठी धक्का मानला जात आहे. (Former MP of NCP Adv. Suresh Jadhav will go to the Shinde group)
परभणी लोकसभा मतदार संघातून ॲड. सुरेश जाधव हे शिवसेनेच्या तिकीटावर १९९६ आणि १९९९ असे दोन वेळा निवडून गेले होते. पण, त्यानंतर त्यांनी शिवसेना सोडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मूळचे गंगाखेड तालुक्यातील रहिवाशी असलेले ॲड. सुरेश जाधव हे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासूनही हातचे अंतर राखून वागत होते. अखेर माजी खासदार जाधव यांनी ता. २८ जुलै रोजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे त्यांच्या प्रदेश उपाध्यक्ष पदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा पाठविला आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली होते. तेव्हा पासूनच ते शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा होत आहे. परंतू अद्याप त्यांनी यावरील मौन सोडलेले नाही. त्यांनी आपण मुख्यमंत्र्याकडे पालम, गंगाखेड व पूर्णा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे करून त्वरीत नुकसान भरपाई मिळावी, यासाठी निवेदन घेऊन गेलो होते, असे या भेटीचे कारण सांगितले आहे. परंतू ते लवकरच शिंदे गटात सहभागी होऊ शकतात, अशी चर्चादेखील परभणी जिल्ह्यात रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.