संजयमामांची राष्ट्रवादीवर निष्ठा कायम; मात्र महेश कोठेंचे ‘साहेब’ अजूनही ठरेनात?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत राहू शकत नाही, हे माहिती असतानाही आमदार शिंदे यांनी महाआघाडीला मतदान केले. त्यांच्या या भूमिकेचे अनेकांनी आश्‍चर्यही व्यक्त केले.
Sanjay Shinde-Mahesh Kothe
Sanjay Shinde-Mahesh KotheSarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचे निष्ठावंत सहकारी म्हणून ओखळ असलेले आमदार बबनराव शिंदे (Baban Shinde) आणि माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांची भाजप प्रवेशाची चर्चा सध्या सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात चवीने चर्चिली जात आहे. अपक्ष आमदार संजय शिंदे (Sanjay Shinde) हे मात्र या प्रकारात शांत दिसत आहेत. सोलापूर जिल्ह्यासह राज्यातचे राजकारण कायम अस्थिर असताना करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांनी मात्र अस्थिरतेत स्थैर्य शोधण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत राहू शकत नाही, हे माहिती असतानाही आमदार शिंदे यांनी महाविकास आघाडीला मतदान केले. त्यांच्या या भूमिकेचे अनेकांनी आश्‍चर्यही व्यक्त केले. अस्थिर राजकारणात कुठे तरी स्थिर होण्याचा प्रयत्न आमदार शिंदे यांनी या माध्यमातून केल्याचे दिसत आहे. (Sanjay shinde's loyalty to NCP remains; will Mahesh Kothe's 'Saheb' still not decided?)

आमदार संजय शिंदे यांची भूमिका वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळी राहिली आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनेक नेते २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजप व शिवसेनेमध्ये गेले, त्यावेळी आमदार शिंदे हे भाजपच्या पाठिंब्यावर जिल्हा परिषद अध्यक्ष होते. ते माढ्यातून लोकसभेची निवडणूक भाजपकडून लढतील, असाच सर्वांचा अंदाज असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी स्वीकारत अनेकांना धक्का दिला. जिल्हा परिषदेचे २०१७ मध्ये अपक्ष सदस्य झाल्यानंतर शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्यावर सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळविले.

Sanjay Shinde-Mahesh Kothe
अजितदादांनी फडणवीसांना सुनावले; ‘पाच अन्‌ सात काय करता?, मदतीचे बोला...’

जिकडे सत्ता तिकडे संजय शिंदे आत्तापर्यंतची भूमिका

संजय शिंदे यांच्या अध्यक्षपदाला विरोध करण्यासाठी सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसने सांगोल्यातील अनिल मोटे यांना मैदानात उतरविले होते. शेवटच्या क्षणी चमत्कारिकरित्या मोटेंनी माघार घेतल्याने संजय शिंदे झेडपीचे बिनविरोध अध्यक्ष झाले. अध्यक्ष झाल्यानंतर अवघ्या दोन वर्षांनी झालेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ते माढ्यातून राष्ट्रवादीचे उमेदवार झाले. माढ्यातून पराभूत झाल्यानंतर २०१९ मध्ये करमाळ्यातून अपक्ष आमदार झाले. आमदार होताच त्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांना जाहीर पाठिंबा दिला. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताना त्यांनी महाविकासच्या बाजूने मतदान केले. २०१७ ते २०१९ या दोन वर्षात आमदार संजय शिंदे यांच्या वारंवार बदलत्या भूमिकांमुळे जिकडे सत्ता तिकडे आमदार शिंदे ही चर्चा जाहीरपणे होऊ लागली. त्याचा काहीसा फटकाही आमदार शिंदे यांना बसला आहे.

Sanjay Shinde-Mahesh Kothe
राहुल शेवाळेंचे स्पष्टीकरण : गटनेत्यावरील नाराजीमुळे सर्वांनी मिळून गटनेता बदलला

राष्ट्रवादीच्या पाठीशी राहण्याचे संकेत

आमदार शिंदे यांनी राजकारणात काम करताना सुरूवातीपासूनच पक्षाच्या झेंड्यापेक्षा पक्षातील नेतृत्वावर श्रध्दा ठेवून काम केल्याने शिंदे नक्की कोणाचे? हा प्रश्‍न वारंवार निर्माण झाला. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अडीच वर्षे मंत्री नसतानाही मंत्रालयात आणि जिल्हा प्रशासनात आमदार शिंदे यांचा असलेला वट अनेकांनी अनुभवला आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेतून पायउतार होणार, हे स्पष्ट असतानाही आमदार शिंदे यांनी महाआघाडीच्या बाजूनेच मतदान करत राज्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणात स्थिर होण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. आमदार शिंदे यांनी त्यांची भूमिका राष्ट्रवादीच्या बाजूने स्पष्ट केली आहे. जिल्ह्याच्या राजकारणात भगदाड पडत असलेली राष्ट्रवादी आमदार शिंदे यांना आगामी काळात काय संधी देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sanjay Shinde-Mahesh Kothe
धनंजय मुंडे यांच्या कारखान्याकडे एक रुपयाही थकीत नाही

महेश कोठे नेमके कोणाचे?

कॉंग्रेस आणि शिवसेनेत थेट प्रवेश आणि भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाची चर्चा माजी महापौर महेश कोठे (Mahesh kothe) यांच्याभोवती फिरत आली आहे. सत्तेसोबत जाणारे अशीच प्रतिमा कोठे यांची झाली आहे. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाल्यानंतर कोठेंच्या बदलत्या भूमिकेचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. कॉंग्रेसमध्ये कोठेंचे स्थान काय होते? याची प्रचिती कोठे यांनी कॉंग्रेस सोडल्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत आली. कोठे यांची ताकद किती आहे? याची अनुभुती कोठे शिवसेनेत आल्यानंतर झाली. शिवसेना असो की कॉंग्रेस यांनी आमचा फक्त वापरच करून घेतला.

Sanjay Shinde-Mahesh Kothe
Sharad Pawar: शरद पवारांच्या दौऱ्यामुळे धुळ्यात राष्ट्रवादीला बळ

(कै.) विष्णूपंत कोठे असोत की महेश कोठे यांना आमदारकी किंवा खासदारकीची संधी दिली नाही, ही भावना आजही कोठे गटात सलत आहे. झालेला अन्याय दूर करण्यासाठी महेश कोठे विविध पक्षांचा पर्याय अवलंबत आहेत. पर्याय अवलंबण्यात मात्र त्यांच्या विश्‍वासार्हतेबद्दल प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. महेश कोठे नक्की कोणाचे? हे सिध्द करण्याची वेळ आता आली आहे. परवा अक्कलकोट तालुक्यात झालेल्या अपघाताही वेळी ‘साहेब या जखमीशी बोला, त्या जखमी बोला’, असे व्हिडिओ कॉलद्वारे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलत हेाते. त्यामुळे त्यांच्या निष्ठेविषयी पुन्हा चर्चा निर्माण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com