Aurangabad News : जी-२० परिषदेच्या निमित्ताने शहरा व अजिंठा-वेरुळ या जगप्रसिद्ध लेण्यांना भेट देण्यासाठी येणाऱ्या विदेशी पाहुण्यांमुळे रखडलेल्या रस्ते कामांना कमालीचा वेग आला आहे. (Aurangabad)औरंगाबाद ते अंजिठा या गेल्या कित्येक वर्षापासून रखडलेल्या रस्त्याचे काम पुर्ण करण्यासाठी जानेवारी अखेरची डेडलाईन निश्चित करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी (Collector) आस्तिककुमार पांडेय, पोलिस अधिक्षक मनीष कलवानीया यांनी आज या रस्त्याची संयुक्त पाहणी केली. (Marathwada) औरंगाबाद जळगाव टी पॉइंट ते अजिंठा लेणी पर्यंतच्या रस्त्याची कामे जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
हर्सूल ते अजिंठा रस्त्याची जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षकांनी आज संयुक्त पाहणी केली. तहसीलदार आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांत समन्वय ठेवून रस्त्याचे काम पुर्ण करावे. या कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पांडेय यांनी स्पष्ट केले.
पर्यटकांची संख्या पाहता अजिंठा लेणी परिसरात रुग्णवाहिका आणि डॉक्टराची नेमणूक करावी. एक खिडकी तिकीटाची निर्मिती तसेच वीजपुरवठा खंडित होवू नये म्हणून महावितरण आणि वन विभागाने याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी. लेणी परिसरात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, भारतीय पुरातत्व विभाग यांनी पर्यटकांसाठी आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.