दौरा आटोपता घेणाऱ्या पालकमंत्री गडाख यांचा ताफा शेतकऱ्यांनी अडवला..

(Guardian Minister) आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, (Shankarrao Gadakh)असे सांगत लवकरच मदत करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
Guardian Minister Shankarrao Gadakh
Guardian Minister Shankarrao GadakhSarkarnama
Published on
Updated on

उस्मानाबाद ः पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेले उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी अवघ्या पाच तासात आपला दौरा आटोपला. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीने जवळपास पावणे दोन लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री गडाख आज जिल्ह्यात आले होते.

पण त्यांनी आपला दौरा अवघ्या पाच तासात आटोपता घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला, त्यांनी गडाखांचा ताफा आडवत शेताच्या बांधावर येऊन पाहणी करण्याची मागणी केली. दुपारी साडे बाराच्या दरम्यान उस्मानाबाद तालुक्यातील रामवाडी येथील गावकऱ्यांनी पालकमंत्र्यांचा ताफा अडवला.

बांधावर येऊन आमच्या नुकसानीची पाहणी करा, असा हट्ट हे शेतकरी करत होते. त्यानंतर इरला येथील महिलांनी देखील पालकमंत्र्यांना अडवत आमच्या पडलेल्या घराना भेटी द्या, असा आग्रह धरला. त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. महिलांच्या भावना तीव्र होत्या, त्या मोठ्याने ओरडून गडाख यांच्याकडे आपल गाऱ्हाणं मांडत होत्या.

यावेळी पोलीसांनी महिलांना रोखण्याचा प्रयत्न केल्याने शाब्दिक चकमकही झाली. या महिलांचा रोष पाहुन पालकमंत्र्यांना पडलेल्या घरांना भेट देऊन पाहणी करावी लागली. तर तिकडे तेरमध्ये भाजपचे आमदार राणा पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनीही पालकमंत्र्यांचा ताफा अडवत त्यांच्यांवर प्रश्नांचा भडीमार केला. आठ दिवसांत मदत करा अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा त्यांनी पालकमंत्र्यांना दिला.

Guardian Minister Shankarrao Gadakh
महापालिका प्रभाग रचना : जयंत पाटील यांनी काँग्रेसला पाडले तोंडावर

दरम्यान शेतकऱ्यांनी काही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारी देखील पालकमंत्र्यांकडे केल्या. शेतकऱ्यांचा रोष पाहून पालकमंत्र्यांनी आपला पाहणी दौरा आटोपता घेतला. आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असे सांगत लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले . प्रत्यक्ष नुकसान झालेल्या ठिकाणाची पाहणी न करता रस्त्यालगतच्या गावांना भेटी देत पालकमंत्री निघून गेले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com