SHIVSENA-BJP News : गणपती बाप्पासमोर एकत्र आलेल्या नेत्यांची मनं जुळतील का ?

Ganapati Bappa brought Khaire-Bhumre together, all opponents on one platform : संदीपान भुमरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाला साध दिल्यापासून खैरे त्यांच्यावर गद्दारी केल्याचा आरोप करतात. तर त्याला प्रत्युत्तर देतांना या खैरेंनी 25 वर्षात जिल्ह्याची वाट लावली, असा आरोप करतात
Shivsena-Bjp Smabhajinagar
Shivsena-Bjp SmabhajinagarSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar Political News राजकारणात आज इथे उद्या तिथे हे नवीन नाही. पण 35-40 वर्ष एकत्र, एकाच पक्षात राजकारण करणारा सहकारी, मित्र दगाबाज निघाला तर मग मात्र त्याचे तोंड पाहण्याची देखील इच्छा होत नाही. राज्याच्या राजकारणात गेल्या दोन वर्षात ज्या काही घडामोडी घडल्या, फोडाफोडी झाली त्यातून अनेक वर्ष सोबत वावरणाऱ्या पण आता वेगळ्या वाटेवर असलेल्या राजकीय नेत्यांची संख्या वाढली आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत हे नेते आपली खदखद बाहेर काढतात.

अशा नेत्यांच्या यादीत सध्या सर्वाधिक चर्चेत असलेले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) आणि विद्यमान खासदार शिवसेना शिंदे गटाचे संदीपान भुमरे यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. नुकतेच हे दोन्ही नेते एका कार्यक्रमात आज एकमेकांना नडले. जाहीर कार्यक्रमात आवाज चढवत या दोघांनी आपला राग काढला. इतर पाहुण्यांनी हस्तक्षेप केल्यामुळे हा वाद काहीसा शमला. गणरायाच्या आगमनानिमित्त शहराचे ग्रामदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री संस्थान गणपतीच्या आरतीसाठी चंद्रकांत खैरे-संदीपान भुमरे एकाच व्यासपीठावर आले.

सोबत मंत्री अतुल सावे, भाजपचे खासदार डाॅ. भागवत कराड, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे ही उपस्थित होते. तसा हा कार्यक्रम दरवर्षी ठरलेला असतो आणि वर्षभर ऐकमेकांवर कितीही कुरघोडी, आरोप, टीका केली तरी सर्वपक्षीय नेते हा सगळा वाद बाजूला सारून गणरायासमोर नतमस्तक होतात. खैरे-भुमरे यांच्यातील शाब्दिक युद्ध लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून सुरू होते. संदीपान भुमरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाला साध दिल्यापासून खैरे त्यांच्यावर गद्दारी केल्याचा आरोप करतात.

Shivsena-Bjp Smabhajinagar
Chandrakant khaire : पुतळा कोसळल्याप्रकरणी चंद्रकांत खैरे यांचे वादग्रस्त विधान, म्हणाले, 'राज्यात...'

तर त्याला प्रत्युत्तर देतांना या खैरेंनी 25 वर्षात जिल्ह्याची वाट लावली, असा आरोप करतात. अगदी संदीपान भुमरे पालकमंत्री असताना खैरे यांनी कधी त्यांना मंत्री म्हणून मान दिला नाही. (Sandipan Bhumre) उलट ते समोर दिसले की खैरे आपला मार्ग बदलायचे. आजच्या कार्यक्रमात खडाजंगी झाल्यावर संस्थान गणपती येथे आरती आणि त्यानंतरच्या कार्यक्रमात नेमके दोघे शेजारी-शेजारीच बसले होते.

दोघांच्याही देहबोलीतून कार्यक्रमातील वादाचा राग स्पष्टपणे जाणवत होता. तर त्यांच्या बाजूला भाजपचे खासदार भागवत कराड, मंत्री अतुल सावे होते, पण आम्ही त्या गावचेच नाही असा, त्यांचा आविर्भाव होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक काळ सत्ता ही शिवसेना-भाजप या दोन पक्षांची होती. त्यामुळे सगळेच नेते ऐकमेकांची बलस्थाने आणि कच्चे दुवे चांगलेच ओळखून आहेत.

Shivsena-Bjp Smabhajinagar
Sandipan Bhumre : संदिपान भूमरेंचं चंद्रकांत खैरेंना ओपन चॅलेंज; म्हणाले, "तुम्ही फक्त उमेदवारी..."

पण 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला आणि शिवसेना-भाजपची नैसर्गीक युती तुटली. पुढे असे काही राजकारण झाले की शिवसेनेचे दोन तुकडे झाले. तेव्हापासून या नेत्यांमधून विस्तवही जात नाही. पण काही वेळासाठी का होईना, आज गणरायासमोर पुन्हा एकदा शिवसेना-भाजपची जुनी युती दिसली. गणरायासमोर एकत्र आलेल्या या नेत्यांची मनं कधी जुळतील? अशी चर्चा या सगळ्यांकडे पाहणाऱ्यांमध्ये होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com