Chandrakant khaire : पुतळा कोसळल्याप्रकरणी चंद्रकांत खैरे यांचे वादग्रस्त विधान, म्हणाले, 'राज्यात...'

chandrakant khaire controversial statement shivaji maharaj statue : पोलिस कितीही येऊद्या, आम्हाला 40 वर्षापासून सवय झाली आहे. पोलिस येतात. घेऊन जातात, काही होत नाही. लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये आंदोलन अधिकार आहे, असे देखील चंद्रकांत खैरे म्हणाले.
Chandrakant khaire
Chandrakant khairesarkarnama
Published on
Updated on

Chandrakant khaire News : शिवाजी महाराजांचा मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याप्रकरणी आज (रविवारी) महाविकास आघाडीने 'जोडो मारो' आंदोलन करत मुंबईत मोर्चा देखील काढला होता. या आंदोलनात सहभागी झालेले ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

शिवाजी महाराजांचा पुतळा पडला पण राज्यात दंगली झाल्या नाहीत. दंगली झाल्या पाहिजेत, असे वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले.

चंद्रकांत खैरे म्हणाले, 'कुठल्याही गावात एकदा पुतळा पडला. तो छत्रपती शिवाजी महाराजांचा असो आंबेडकरांचा असो, कोणाचाही. जर ते विघ्नसंतोषी माणसाने केलं तर मोठ्या दंगली होतात. पण येवढा मोठा पुतळा पडला. मला हे समजत नाही या महाराष्ट्र सरकारच्या विरोधात दंगली का होत नाही? झाल्या पाहिजेत. माझं स्पष्ट मतं आहे झाल्या पाहिजे.'

Chandrakant khaire
Uday Samant on Uddhav Thackeray : 'न्यायमूर्तींनाच न्याय देण्याबाबत सल्ले देणारे महाभाग..' ; उदय सामंतांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा!

'आज महविकास आघाडीचे जोडे मारो आंदोलन उद्धवजी, नाना पटोले, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली चालले आहे. पोलिस कितीही येऊद्या, आम्हाला 40 वर्षापासून सवय झाली आहे. आंदोलन असले की पोलिस येतात. घेऊन जातात. काही होत नाही. लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये आंदोलन अधिकार आहे.', असे देखील चंद्रकांत खैरे म्हणाले.

शरद पवार काय म्हणाले?

शरद पवार म्हणाले, गेट वे ऑफ इंडिया येथे शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे. सागरी किनाऱ्यावरील हा पुतळा गेली 50 वर्षे सर्वांना प्रेरणा देत आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात शिवरायांचे अनेक पुतळे आहेत. पण, मालवणध्ये उभा करण्यात आलेला पुतळा भ्रष्टाचाराचा नमुना होता.मालवणमधील पुतळ्याच्या उभारणीत भ्रष्टाचार झाल्याचा समज जनतेत आहे. हा शिवरायांचा आणि शिवप्रेमींचा अपमान आहे. हा अपमान करण्याची भूमिका घेणाऱ्यांचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा होता.

Chandrakant khaire
Raosaheb Danve News : ...तर पवार, ठाकरे, पटोलेंनी लेखी द्यावे ; रावसाहेब दानवेंचे आव्हान..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com