Tuljapur Political News : उद्धव ठाकरेंपुढे गणेश सोनटक्केंनी रोचकरींना ठोक-ठोक ठोकलं, अन् आमदारकी गमावली

Uddhav Thackeray In Marathwada : २००४ मध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या विरोधात वातावरण होते.
Ganesh Sontakke, Uddhav Thackeray
Ganesh Sontakke, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Dharashiv Political News : राजकारणात 'टर्निंग पाॅइंट' महत्त्वाचा असतो. हा क्षण ओळखून काम केले तर नक्कीच संधीचे सोने होते. ही संधी ओळखता आली नाही, तर स्वप्नावर पाणी फेरते. तसाच काहीसा प्रकार गणेश सोनटक्के यांच्याबाबतीत घडला. केवळ २००४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी घडलेल्या एका घटनेने त्यांना आमदारकीची आलेली संधी सोडावी लागली होती. (Latest Political News)

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील ग्रामपंचायतीवर १९९७ पासून सलग जवळपास २५ वर्षे गणेश सोनटक्के यांच्या पॅनेलची निर्विवाद सत्ता होती. त्यावेळी त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून जळकोटमधील पदधिकाऱ्यांना एकत्रित बांधून ठेवले होते. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावचा चौफेर विकास केला. गावात स्वछता मोहीम राबवली. आजही प्रत्येक दिवाळीला महिलांना साडी भेट दिली जाते. त्यामुळे या विविध उपक्रमांतून संपर्क वाढवीत ग्रामीण भागात शिवसेना वाढविण्यात त्यांचे योगदान मोठे होते.

Ganesh Sontakke, Uddhav Thackeray
Swabhimani Sanghtna : साखर कारखानदारांच्या घरावर 'ढोल बजाओ!' ३१०० रुपये दरासाठी स्वाभिमानी आक्रमक

गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून अधिक काळ सक्रिय राजकारणात असलेले गणेश सोनटक्के यांनी सुरुवातीला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राजकारणीतल मुहूर्तमेढ रोवली. जळकोट ग्रामपंचायतीवर सलग २५ वर्षे त्यांच्या पॅनेलची सत्ता होती. ते स्वतः १० वर्षांपासून अधिक काळ सरपंच राहिले. त्यासोबतच काही काळ ते तुळजापूर पंचायत समितीचे सदस्य होते. त्याशिवाय दोन वेळेस स्वतः धाराशिव जिल्हा परिषदेचे सदस्य होते. त्यानंतर एक वेळेस त्यांच्या पत्नी सविता सोनटक्के जिल्हा परिषदेच्या सदस्य होत्या. (Maharashtra Political News)

या माध्यमातून त्यांनी तुळजापूर तालुक्यात मोठा नावलौकिक मिळवला आहे. शिवसेनेत शाखाप्रमुखापासून जिल्हा उपप्रमुखापर्यंत सर्वच पदे मिळवली आहेत. त्यामुळे त्यांना तुळजापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून तयारी करण्याच्या सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या. त्यामुळे २००४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी दोन वर्षे आधीपासूनच कामाला लागले होते.

तुळजापूर तालुक्यातील प्रत्येक वाडी-वस्ती पिंजून काढत त्यांनी शिवसेनेसाठी वातावरण पोषक बनवले होते. त्यामुळे पहिल्यांदा तुळजापुरातून शिवसेनेचा भगवा फडकण्याची संधीही चालून आली होती. त्यामुळे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आराध्य दैवत असलेल्या तुळजाभवानीचे मंदिर असलेल्या तुळजापूर मतदारसंघावर भगवा फडकविण्याचे स्वप्न साकार होणार, असे वातावरण निर्माण झाले होते.

सलग दुसऱ्या वेळी तुळजापूरमधून कोणीच विद्यमान आमदार दुसऱ्यांदा निवडून येत नाही, असे २००४ पर्यंतचा इतिहास होता. त्यानंतर १९९९, २००४, २००९, २०१४ सलग चार निवडणुकीत मधुकर चव्हाण हे विजयी झाले होते. त्यामुळे २००४ मध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या विरोधात वातावरण होते. त्याचवेळी विधानसभेसाठी इच्छुक असलेले देवानंद रोचकरी यांनी निवडणुकीच्या पूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनीही विधानसभेसाठी मलाच उमेदवारी हवी, म्हणत जोरदार ताकद लावली. सोनटक्के व रोचकरी या दोन्ही गटांच्या समर्थकांकडून जोरदार ताकद लावण्याचा प्रयत्न केला जात होता.

Ganesh Sontakke, Uddhav Thackeray
Amol Kolhe In Satara : चिमुकल्याचा खासदार अमोल कोल्हेंना राजकीय सल्ला; म्हणाला, 'शरद पवारांची साथ...'

२००४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राज्यभर सर्वत्र दौरा करत होते. त्यावेळी त्या दौऱ्यानिमित्त ते सोलापरवरून उमरगा जाणार होते. उमरग्याला सभेसाठी जाणार असल्याने रस्त्यात जळकोट येथे उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचा मोठा कार्यक्रम गणेश सोनटक्के यांनी आयोजित केला होता. उद्धव ठाकरे येणार असल्याने रोचकरी व सोनटक्के या दोन्ही गटांकडून शक्तिप्रदर्शनाची मोठी तयारी केली होती. याच वेळी दोन्ही गटांकडून मोठी बॅनरबाजी करण्यात आली होती. दोन्ही गटांनी आपल्यालाच उमेदवारी मिळावी, यासाठी मोठी गर्दी जमवली होती.

या वेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोरच दोन्ही गटांतील शिवसैनिकांत मोठा वाद झाला. दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. पोलिसांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटवला. मात्र, या राड्यामळे ऐन निवडणुकीपूर्वीच गणेश सोनटक्के व देवानंद रोचकरी यांना अटक झाली. या दोघांनाही काही दिवस जाऊन जेलमध्ये बसावे लागले.

या घटनेमुळे उद्धव ठाकरे यांनी या दोघांनाही उमेदवारी न देता ऐन निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या माजी आमदार नरेंद्र बोरगावकर यांना उमेदवारी दिली. मात्र, या ठिकाणी त्यांना पराभव स्वीकाराला लागला. मात्र, तीच संधी गणेश सोनटक्के यांना मिळाली असती तर ते नक्कीच आमदार झाले असते, अशी चर्चा होती. २०१९ पासून ते भाजपमध्ये आहेत. सध्या त्यांचे चिरंजीव अॅड. आशिष सोनटक्के हे जळकोट ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

Ganesh Sontakke, Uddhav Thackeray
Shivaji Kardile Vs Prajakt Tanpure : सत्ता भोगलेल्यांना टीकेचा अधिकार नाही; शिवाजी कर्डिलेंचा प्राजक्त तनपुरेंवर पलटवार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com