Gangapur Constituency News : माने पिता-पुत्रांच्या बीआरएस प्रवेशाने राष्ट्रवादीच्या चव्हाणांचा मार्ग मोकळा..

BRS : चव्हाण यांना तीन टर्म आमदार असलेल्या बंब आणि आता माने पिता-पुत्रांच्या विरोधाचा सामना करावा लागणार.
Gangapur Constituency News
Gangapur Constituency News Sarkarnama

Marathwada Politics : माजी आमदार अण्णासाहेब माने व त्यांचे पुत्र संतोष यांनी नुकताच बीआरएस (BRS) पक्षात प्रवेश केला. या अचानक घेतलेल्या निर्णयाने त्यांच्या समर्थकांना धक्का बसला. पंरतु त्यांच्या या निर्णयाने मराठवाडा पदवीधरचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांचा गंगापूर विधानसभा लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या वर्षभरापासून चव्हाण हे या मतदारसंघातून लढण्याची तयारी करत आहेत.

Gangapur Constituency News
Sanjay Shirsat As A Spokesperson: ठाकरे गटावर तुटून पडणारे शिरसाट आता शिवसेनेचे अधिकृत प्रवक्ते..

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे कट्टर समर्थक असल्याने गंगापूरमधून त्यांनाच उमेदवारी मिळणार हे जवळपास स्पष्ट झाल्यामुळेच माने-पिता पुत्रांनी बीआरएसची वाट धरल्याचे दिसते. (NCP) तसे माने कुटुंबिय हे सुरुवातीपासून शिवसेनेत होते. २००४ आणि २००९ मध्ये अण्णासाहेब माने दोनवेळा गंगापूर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते. २०१४ मध्ये पक्षाने माने यांना डावलून अंबादास दानवे यांना उमेदवारी दिली तेव्हा नाराज माने यांनी आपली उपद्रव शक्ती दाखवत दानवेंचा करेक्ट कार्यक्रम केला.

विद्यमान आमदारांना डावलून उमेदवार बदलल्याचा फटका तेव्हा शिवसेनेला बसला, पण नाराज माने नव्या पक्षाच्या शोधात होते. (Bjp) २०१९ च्या विधानसभा निवडणुकीचा विचार करता माने यांनी मुलाच्या राजकीय भविष्यासाठी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला. भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात राष्ट्रवादीने संतोष माने यांना उमेदवारीही दिली, पण त्यांचा बंब यांच्यापुढे टिकाव लागला नाही. तरी देखील माने यांनी ७२ हजार एवढी लक्षवेधी मते घेतली.

संतोष माने यांचे युवासेनेच्या माध्यमातून तालुक्यात चांगले संघटन होते. पुढे राष्ट्रवादीत त्यांना याचा उपयोग झाला, २०१९ मध्ये हुकलेला विजय २०२४ मध्ये साकारण्याचे माने-पिता पुत्रांचे स्वप्न सतीश चव्हाण यांच्या गंगापूरमधील हस्तक्षेपाने भंगणार होते. त्यामुळे पक्षाशी संघर्ष करण्यापेक्षा नवा पर्याय म्हणून त्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला. गंगापूर-खुलताबाद मतदारसंघाचा विचार केला तर माने यांचा जनसंपर्क मतदारसंघात दांडगा आहे. परंतु गेली दोन टर्म म्हणजे दहा वर्ष आमदारकी, सत्ता नसल्याने परिस्थीती थोडी बदलल्याचे चित्र आहे. तालुक्यात असलेले नाते संबंध, भावकी हे माने यांचे बलस्थान समजले जाते.

या जोरावरच अण्णासाहेब माने यांनी दोनदा आमदारकी मिळवली होती. तर पहिल्यादांच विधानसभा लढवणाऱ्या संतोष माने यांना देखील ३५ टक्यांच्या वर मते मिळवता आली होती. त्यामुळे एकीकडे सतीश चव्हाण यांचा विधानसभा लढवण्याचा मार्ग जरी मोकळा झाला असला, तरी माने पिता-पुत्रांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यामुळे तो अधिक खडतर झाला आहे, हे देखील नाकारून चालणार नाही. राष्ट्रवादीकडून चव्हाण यांना उमेदवारी मिळाली तर त्यांना भाजपच्या तीन टर्म आमदार असलेल्या बंब आणि आता माने पिता-पुत्रांच्या विरोधाचा देखील सामना करावा लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com