CM Eknath Shinde News : असा झटका दिला, की ऑनलाइनवाले लाईनवर आले ; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला..

Marathwada Political News : मुख्यमंत्री बदलणार, सरकार पडणार म्हणत होते. अजितदादा आले आणि सरकार आणखी मजबूत झाले.
Cm Eknath Shinde News
Cm Eknath Shinde NewsSarkarnama

Parbhani Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परभणीतल्या `शासन आपल्या दारी`, कार्यक्रमातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर टोलेबाजी केली. (CM Eknath Shinde Rally News) आधी सरकार पडणार म्हणत होते, पण अजितदादा आमच्यासोबत आले आणि सरकार आणखी मजबुत झाले. आता म्हणतात मुख्यमंत्री बदलणार. त्यांना काय बोलायचे ते बोलू द्या, आपण काम करत राहू असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

Cm Eknath Shinde News
Jaidatta Kshirsagar Indicate Statement : मी अजितदादांच्या सभेला जाणार नाही, पण योग्यवेळी योग्य निर्णय घेईन; जयदत्त क्षीरसागरांचे सूचक विधान

जे गेली अडीच वर्ष घरात बसून ऑनलाइन कारभार करत होते, त्यांना आम्ही असा काही झटका दिला की ते लाईनवर आले, असा टोला शिंदे (Eknath Shinde) यांनी लगावला. शासन आपल्या दारी कार्यक्रमातून सरकारी योजनाचा लाभ सर्वसामान्यांना कसा होत आहे हे सांगतांनाच मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीकाही केली.

शासन आपल्या दारी या कार्यक्रमाची सुरूवात आम्ही एप्रिल महिन्यात पाटणपासून केली. पण आमचे विरोधक तिकडे पाटण्यात एकत्र जमले आणि द्वेषाची, राजकारणाची खिचडी शिजवत होते. (Uddhav Thackeray) पण त्यावर मला काही बोलायचे नाही, ज्यांना राजकारण करायचे त्यांना ते करू द्या, आपण काम करू.देश चंद्रावर चालालायं, पण काही लोक घरात बसून ऑनलाइन काम करायचे. त्यांना आम्ही झटका दिला आणि लाईनीवर आणले, तरीही त्यांचे भोंगे रोज वाजत आहेत.

मुख्यमंत्री बदलणार, सरकार पडणार म्हणत होते. अजितदादा आले आणि सरकार आणखी मजबूत झाले. आता म्हणतात मुख्यमंत्री बदलणार, एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाल्याने त्यांचा जळफळाट होत आहे. आमच काय होणार याची भिती त्यांच्या मनात आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून आतापर्यंत शंभर कोटी रुपये गोरगरिबांच्या उपचारासाठी दिले. पण अडीच वर्षाच्या त्यांच्या काळात फक्त दोन ते अडीच कोटीच निधी खर्च झाला म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या कारभारावर बोट ठेवले.

अजित पवारांच बारामतीत जंगी स्वागत झाले. त्यांच्या बाबतीत काहींनी गुगली टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांना ते करू द्या. त्यांनाही अजित पवारांची भूमिका पटते आहे, असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांच्या विधानावरून केला. जगात जर्मनी आणि भारतात परभणी असे म्हणतात, पण इथे काम करावे लागेल. रस्त्यांसाठी निधीची व्यवस्था केली जाईल, चकाचक रस्ते करू. तिजोरी आणि चावी दोघंही इथे आहेत, असेही शिंदे म्हणाले. पावसाने ओढ दिली असली तरी काळजी करू नका, शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात दिले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com