Jaidatta Kshirsagar Indicate Statement : मी अजितदादांच्या सभेला जाणार नाही, पण योग्यवेळी योग्य निर्णय घेईन; जयदत्त क्षीरसागरांचे सूचक विधान

Beed Politics : लोकशाही मार्गाने प्रत्येकाला निर्णय घेण्याची मुभा आहे.
Jaidatta Kshirsagar
Jaidatta KshirsagarSarkarnana
Published on
Updated on

Beed : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेला मी जाणार ही केवळ अफवा आहे. मी पवारांच्या सभेला जाणार नाही, असे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांन स्पष्ट करून योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात येईल, असे सूचक विधानही त्यांनी केले. (I will not go to Ajitdada's Sabha; But I will take a decision at the right time: Jaidatta Kshirsagar)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज (ता. २७ ऑगस्ट) बीडमध्ये जाहीर सभा होत आहे. त्या सभेला माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे जाणार आहेत, अशी चर्चा बीडमध्ये रंगली आहे. मात्र, खुद्द क्षीरसागर यांनी त्याचे खंडन केले आहे. आपण अजित पवार यांच्या सभेला जाणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले की, आमच्या संस्थांच्या सर्वसाधारण बैठका आज आहेत आणि त्या पूर्वनियोजित आहेत. त्या काही आम्ही जाणीवपूर्वक आयोजित केलेल्या नाहीत. ही बैठक एक महिनाभरापूर्वी ठरलेली आहे.

Jaidatta Kshirsagar
Nanded Shivsena News : उद्धव ठाकरेंवर जेसीबीने पुष्पवृष्टी करू नका; नांदेड पोलिसांनी परवानगी नाकारली, शिवसैनिक संतप्त

सुमारे चार वर्षापूर्वी एक पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी बंड केल्यानंतर दुसरा पुतण्या योगेश क्षीरसागर यांनी तुम्हाला सावरले होते. त्यांनीही आता बंड केले आहे, याबाबत क्षीरसागर म्हणाले की, लोकशाही मार्गाने प्रत्येकाला निर्णय घेण्याची मुभा आहे. त्यामुळे या पुतण्याच्या बंडावर जास्त भाष्य करण्याची आवश्यकता मला वाटत नाही.

Jaidatta Kshirsagar
Pratibhatai Pawar News : प्रतिभा पवारांनी ४४ वर्षांत प्रथमच घेतले वळसे पाटलांशिवाय भीमाशंकरचे दर्शन...

दरम्यान, संदीप क्षीरसागर यांनी बंड करत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना आव्हान दिले होते. त्यांनी बीड नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत काकांना मात दिली होती. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही संदीप क्षीरसागर यांनी जयदत्त यांचा पराभव केला होता. त्या सर्व घडामोडीत योगेश क्षीरसागर हे पुतण्या मात्र क्षीरसागरांच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता.

Jaidatta Kshirsagar
Nitin Desai Case : सनी देओलला एक न्याय अन्‌ आमच्या नितीन देसाईंना वेगळा न्याय का?; संजय राऊतांचा सवाल

योगेश क्षीरसागर आणि भारतभूषण क्षीरसागर यांनी नुकतेच अजित पवार पवार गटात प्रवेश केला आहे. त्याचवेळी जयदत्त क्षीरसागर हेही अजित पवार गटात सामील होतील, अशी चर्चा रंगली होती. मात्र, खुद्द जयदत्त क्षीरसागर यांनी त्याचे खंडन केले आहे. मात्र, योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात येईल, असेही सूचक विधान त्यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com