Georai News : गेवराईतील राडा प्रकरणात पोलिसच झाले फिर्यादी; 55 जणांवर एफआयआर!

Georai Politics : गेवराई नगरपालिका निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी समर्थकांमध्ये झालेल्या राड्यानंतर पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत 55 जणांवर गुन्हे नोंदवले. सीसीटीव्ही तपासावरून पुढील कारवाई सुरू आहे.
Police examine CCTV footage and collect on-ground evidence after a violent clash between BJP and NCP workers during the Georai municipal polls, with FIRs filed against 55 accused.
Police examine CCTV footage and collect on-ground evidence after a violent clash between BJP and NCP workers during the Georai municipal polls, with FIRs filed against 55 accused.Sarkarnama
Published on
Updated on

Local Body Election News : ऐन मतदानाच्या दिवशी गेवराईमध्ये भाजपचे माजी आमदार लक्ष्मण पवार आणि राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी, दगडफेक आणि गाडी फोडण्याचा प्रकार घडला. माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे पीए डावकर यात गंभीर जखमी झाले. या राड्यानंतर गेवराईत तणावाचे वातावरण होते. पोलीस अक्षीक्षक नवनीत काँवत यांनी कालच गेवराईत येऊन धिंगाणा घालणाऱ्यांना सज्जड दम भरला होता. त्यानूसार पोलीसांनीच फिर्यादी बनत पंच्चावन जणांविरोधात विविध कलमांखाली गुन्हे नोंद केले आहेत.

गेवराई नगरपालिका निवडणुकी दरम्यान भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या राड्यानंतर पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासात कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 55 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत 55 जणांविरोधात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बीएनएस 163, 223, 189 व इतर कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. यामध्ये पवार आणि पंडित कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. सीसीटीव्ही फुटेच्या आधारे आणखी काही व्यक्तींवर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया गेवराई पोलीसांकडून सुरू आहे.

काय घडले होते?

गेवराईतील राड्याची सुरुवात अगोदर आतेभाऊ-मामेभाऊ पृथ्वीराज पंडित व शिवराज पवार यांच्या भांडणाने झाली. या भांडणानंतर माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे स्वीय्य सहाय्यक अमृत डावकर यांच्यासोबत बाळराजे पवार यांनी अरेरवारी केली. अमृत डावकर देखील पंडितांच्या नात्यातले म्हणजे पवारांचेही नातेवाईकच आहेत. त्यांच्यासोबत अनुचित प्रकार घडल्याने जयसिंग पंडित व त्यांचे पुत्र पृथ्वीराज पंडित चांगलेच संतापले.

Police examine CCTV footage and collect on-ground evidence after a violent clash between BJP and NCP workers during the Georai municipal polls, with FIRs filed against 55 accused.
Georai Crime News: गेवराईत आजी-माजी आमदाराच्या समर्थकांचा 'धिंगाणा', SP काँवतांनी भरला 'खाकी'चा दम; म्हणाले...

दोघेही बापलेक हातात हात घालून थेट मेहुणे माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरावर धडकले. यावेळी जयसिंग पंडित व लक्ष्मण पवार हे दोघेही मेहुणे एकमेकांवर धावून गेले. या ठिकाणीही वाहनांची तोडफोड झाली. दगडफेकही करण्यात आल्याने गेवराईतील वातावरण चांगले तापले होते. दरम्यान, पोलिस अधीक्षक नवनीत काँवत ताफ्यासह गेवराईत पोचल्यानंतर हा तणाव निवळला. काँवत यांनी कालच दोन राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या ज्या समर्थकांनी गेवराईत राडा घातला त्यांना सोडणार नसल्याचे स्पष्ट केले.

या प्रकरणात फिर्याद आली नाही तरी पोलीस स्वतःहून यात पुढाकार घेऊन आरोपींवर गुन्हे दाखल करणार असल्याचे काँवत यांनी सांगितले होते. त्यानूसार आज पोलीसांनी 55 जणांविरोधात गुन्हे नोंदवले आहेत.

Police examine CCTV footage and collect on-ground evidence after a violent clash between BJP and NCP workers during the Georai municipal polls, with FIRs filed against 55 accused.
Georai Crime News: गेवराईत आजी-माजी आमदाराच्या समर्थकांचा 'धिंगाणा', SP काँवतांनी भरला 'खाकी'चा दम; म्हणाले...

यामध्ये जयसिंग पंडित, पृथवीराज पंडित, बाळराजे पवार, शिवराज पवार, राहूल उमाप, विजय सुतार, जीवन साळवे, प्रकाश साळवे, संकेत कांडेकर, खाजा शेख, अमर शिंदे, विशाल भुंबे, विठ्ठल मोटे, मुन्ना मोटे, राहूल खंडागळे, विष्णु आतकरे, सय्यद एजाज मेंबर, कृष्णा पाटोळे, कैलास माने, प्रदीप सुतार, प्रदीप नन्वरे आदींसह अनोळखी संशयितांचा समावेश आहे. ज्यांनी कोणी शहरातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई केली जाईल, असा इशारा काँवत यांनी काल दिला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com