Georai Pawar Pandit : गेवराईत पवार-पंडितांमध्ये कधी पडली पहिली ठिणगी? एकमेकांचे व्याही कसे झाले कट्टर दुश्मन?

Georai politics : गेवराईतील पवार–पंडित या व्याही असलेल्या कुटुंबांतील राजकीय वैर नगरपालिका निवडणुकीत पुन्हा पेटले. जुना संघर्ष, आरोप-प्रत्यारोप आणि हिंसाचारामुळे पोलिसांना तातडीने हस्तक्षेप करावा लागला.
Pandit-Pawar Family Political Warr In Georai Constituency News.
Pandit-Pawar Family Political Warr In Georai Constituency News.Sarkarnama
Published on
Updated on

Georai Assembly Constituency Politics : नगरपालिका निवडणुकीत गेवराईमध्ये पंडित आणि पवार हे नात्याने एकमेकांचे व्याही असणारे कुटुंब राजकीय वर्चस्वाच्या लढाईतून एकमेकांना भिडले. अगदी घरावर चाल करून जाण्याइतपत त्यांच्यात संघर्ष भडकला. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हत्येचा कट रचल्याचे आरोप झाले. बीडच्या एसपींना गेवराईत धाव घेऊन परिस्थिती हाताळावी लागली. नगरपालिकेच्या मतदानादिवशीच पंडित-पवार संघर्ष झडल्याने याची राज्यभरात चर्चा झाली. पोलीसांनी दोन्ही बाजूच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले.

तर माजी आमदार अमरसिंह पंडित, त्यांचे बंधू विद्यमान आमदार विजयसिंह पंडीत यांनी बाळराजे पवारांवर त्यांनी हत्या करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवाकी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर हल्ला करत काही पुरावे पोलीसांना देत कारवाईची मागणी केली. या घटनाक्रमानंतर गेवराईतील वातावरण जरी सामन्य वाटत असले तरी पंडित-पवार कुटुंबाच्या मनात असलेली आग नगरपालिका निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी पुन्हा बाहेर पडू शकते, ही शक्यता गृहित धरत पोलीस अलर्ट मोडवर आहेत.

गेवराईच्या राजकारणावर तीस वर्षापुर्वी पकड असलेल्या माजी आमदार माधवराव पवार यांच्या कुटुंबातील लक्ष्मण आणि बाळराजे पवार हे दोन भाऊ. त्यांची सख्खी बहीण पंडित यांच्या कुटुंबात जयसिंगराव शिवाजीराव पंडित यांना दिली आणि पंडित-पवार कुटुंब व्याही बनले. राजकारणात दोन्ही कुटुंबांनी काही तडजोडी केल्या. नगरपालिकेची सत्ता पवार कुटुंबाकडे तर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व पंडितांकडे असा हा समझोता.

त्यामुळे गेली वीस वर्ष गेवराई नगरपालिकेवर बाळराजे पवार व त्यांच्या कुटुंबाची एकहाती सत्ता कायम आहे. तर दुसरीकडे गेवराई विधानसभेतून कोण लढणार? यावरून पंडित कुटुंबातच वाद झाले. बदमराव पंडित यांनी दोनवेळा अपक्ष निवडणूक लढवत जिंकली. काँग्रेसशी विचाराच्या पंडित घराण्यातील सत्तेचा संघर्ष पुढे वाढत गेला.

Pandit-Pawar Family Political Warr In Georai Constituency News.
'Amarsingh Pandit माणसांनी मला ...' Laxman Pawar यांच्या कार्यकर्त्याचा आरोप ।Georai News|

शिवाजीराव पंडित यांचा राजकीय वारसा पुढे चालवणारे त्यांचे चिरंजीव अमरसिंह पंडित, हे दोनवेळा आमदार राहिले. पण त्यांना कायम आपले चुलत बंधू बदामराव पंडित यांच्याशी संघर्ष करावा लागला. एकीकडे पंडित कुटुंबात संघर्ष सुरू असताना वीस वर्षापुर्वी गेवराईत घडलेल्या एक घटनेने पवार कुटुंबावर मोठे संकट कोसळले. बाळराजे पवार यांच्यावर कैलास बिद्रे नावाच्या व्यक्तीच्या खूनाचा आरोप आणि खटला चालला. त्यात न्यायलाने बाळराजे यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. बाळराजे तुरुंगात असताना लक्ष्मण पवार यांनी गेवराईतील राजकारणाची सुत्रे आपल्या हाती घेतली.

बाळराजे पवार शिक्षा भोगत असताना पंडित कुटुंबाने पवार कुटुंबाला एकटे सोडले, अशी भावना या कुटुंबाची झाली आणि त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. बाळाराजे पवार तुरुंगात गेल्यानंतर गेवराई तालुक्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. भाजपमध्ये असताना 2004 मध्ये अमरसिंह पंडित यांचा बदामराव पंडित यांच्याकडून पराभव झाला आणि नाराज झालेल्या अमरसिंह यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली.

Pandit-Pawar Family Political Warr In Georai Constituency News.
Georai Assembly Election : तुम्ही विजयसिंहांच्या पाठीशी रहा; मी महाराष्ट्राची ताकद तुमच्या पाठीशी उभी करतो : अजित पवार

पुढे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. भाजप नव्या नेतृत्वाच्या शोधात असताना गोपीनाथ मुंडे यांनी अमरसिंह पंडित यांना पर्याय म्हणून बाळाराजे पवार यांचे बंधू लक्ष्मण पवार यांना पक्षात आणले. लोकसभा निवडणुकीत लक्ष्मण पवार यांनी गेवराईत भाजपचे नेटाने काम केले आणि याचे बक्षिस म्हणून 2014 आणि 2019 अशा सलग दोन निवडणुकीत भाजपने त्यांना उमेदवारी दिली आणि ते आमदार झाले.

नगरपरिषद तुमची विधानसभा आमची हा पंडित-पवारांच्या कुटुंबात झालेला अलिखित करार बाळराजे यांच्या तुरुंगातील जन्मठेपेच्या शिक्षेनंतर मोडीत निघाला. गेवराई नगरपरिषदेसह विधानसभा मतदारसंघावरही पवार कुटुंबाने आपली मजबुत पकड मिळवली होती. इकडे लक्ष्मण पवार यांनी पंडितांना टोकाचा विरोध तर भाजपची ताकद वाढवली. तर पंडित कुटुंब पुन्हा वर्चस्व मिळवण्यासाठी धडपडत होते. दरम्यान, लक्ष्मण पवार यांनी भाजपा सोडण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा भाजपचे नेतृत्व कोणाकडे? असा प्रश्न निर्माण झाला.

तिकडे जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या बाळराजे पवार यांच्या चांगल्या वर्तणुकीमुळे त्यांची तुरुंगातून सुटका झाली आणि बाहेर येताच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर बाळराजे यांच्यासारखा गेवराई तालुक्याच्या राजकारणावर पकड असलेला नेत्या आल्याने मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांच्या पत्नी गीता पवार यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देत बळ देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, नगपालिकेच्या प्रचारात पवार विरुद्ध पंडित यांच्यातील आरोप-प्रत्यारोप हे वैयक्तिक पातळीवर गेले. पंडित यांच्याकडून बाळराजे हे खून करून परतलेले आहेत, याचा वारंवार उल्लेख केला जाऊ लागला. यातून वादाची पार्श्वभूमी तयार झाली.

त्याचा भडका शेवटी मतदानाच्या दिवशी उडालाच. एका मतदान केंद्रावर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार गीता पवार या गेल्या असताना तिथे उपस्थित राष्ट्रवादीचे पृ्थ्वीराज पंडित यांनी नात्याने सख्ख्या मामी असलेल्या गीता पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचे बोलले जाते. यातूनच मग बाळराजे पवार आणि पंडित समर्थकांमध्ये राडा झाला. एकमेकांची कार्यालयं, बंगल्यावर चाल करून जाण्याइतपत हे प्रकरण बिघडले. दगडफेक, हाणमारीमुळे दोन्ही बाजूचे काहीजण जखमी झाले.

अमरसिंह पंडित यांच्या पीए डावकर यांना गंभीर दुखापत झाली. बीडमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांनी बाळराजे पवार आणि त्यांच्या समर्थकांनी पक्ष कार्यालयावर केलेला हल्ला हा अमरसिंह पंडित यांना जीवे मारण्याचा कट होता, असा गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली. त्यानंतर विजयसिंह पंडित आणि अमरसिंह पंडित यांनीही तोच आरोप करत पोलीस अधीक्षकांची भेट घेत काही पुरावे दिले.

तर दुसरीकडे बाळराजे पवार यांच्या एका जखमी समर्थकानेही अमरसिंह पंडीत हे स्वतः हल्ला करण्यासाठी हातात कट्टा घेऊन आले होते आणि ते बाळराजे पवार यांना आज जिवंत सोडायचे नाही, पृथ्वी तू मार, असे म्हणत असल्याचा दावा केला. आता या दोघांच्या दाव्याची चौकशी पोलीस करत आहेत. एकूण काय? तर राजकारणाती महत्वाकांक्षेने नात्याने एकमेकांचे व्याही असलेल्या पंडित आणि पवार कुटुंबाना आता एकमेकांच्या जीवावर उठवले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com