Latur : कुठूनही द्या, पण लातूरच्या पाण्याची व्यवस्था करा..

लातूरकरांच्या जीवनमरणाचा हा प्रश्न आहे. पुण्याचा पाण्यासंदर्भात जलसंपदा मंत्र्यांनी जी भूमिका घेतली तीच लातूरकरांसाठी घेणार का? (Mla Dhiraj Deshmukh)
Mla Dhiraj Deshmukh, Latur
Mla Dhiraj Deshmukh, LaturSarkarnama
Published on
Updated on

लातूर : महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा आपल्या सरकारचा संकल्प आहे, पण मराठवाडा विशेषत: लातूरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी कुठल्याच योजना आणल्या जात नाहीत. (Latur) २०१६ मध्ये जिल्ह्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली तेव्हा कृष्णेचे पाणी रेल्वेने आणावे लागले होते. त्यानंतर अजूनही लातूरचा पाणी प्रश्न सोडवला जात नाही. (Congress) जलसंपदा मंत्री पुण्याला पाण्याचा एक थेंबही कमी पडू देणार नाही, असे सांगतात, मग लातूरच्या पाण्याचे काय? असा सवाल लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख (Dhiraj Deshmukh) यांनी विधानसभेत उपस्थितीत केला.

पाणी प्रश्नाच्या चर्चेत सहभागी होत असतांना धीरज देशमुख यांनी लातूर जिल्ह्यातील पाणी प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. देशमुख म्हणाले, मराठवाडा दुष्काळ मुक्त करण्याचा सरकारचा संकल्प आहे. पण गेल्या कित्येक वर्षापासून लातूर जिल्ह्याचा पाणी प्रस्न जैसे थे आहे. या विषयावर आपण जलसंपदा मंत्र्यांशी अनेकदा बोललो, पण जिल्ह्याचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी सोडवण्यासाठी कुठलीच योजना अद्याप देण्यात आलेली नाही.

लातूरकरांच्या जीवनमरणाचा हा प्रश्न आहे. पुण्याचा पाण्यासंदर्भात जलसंपदा मंत्र्यांनी जी भूमिका घेतली तीच लातूरकरांसाठी घेणार का? कुठूनही आणा पण लातूरच्या पाण्याची व्यवस्था करा. जलजीवन मिशन अतंर्गत प्रत्येक व्यक्तीला ५५ लीटर पाणी देण्याचा गाजावाजा केला जातोय. २०१६ मध्ये लातूरकरांना रेल्वेने पाणी आणावे लागले होते. पण अजूनही तेव्हाच्या आणि आताच्या परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही.

Mla Dhiraj Deshmukh, Latur
Bjp : फडणवीसांनी शिवसेनेला `संभाजीनगर`ची आठवण पुन्हा करून दिली..

वेळोवेळी मागणी आणि विनंती करून देखील लातूर जिल्ह्यासाठी पाणी योजना मंजुर केली जात नाही. लातूरचा पाणी प्रश्न मंत्री आणि हे सरकार सोडवणार आहे की नाही? असा प्रश्न देखील धीरज देशमुख यांनी सभागृहात उपस्थितीत केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com