Latur District APMC News : जिल्ह्यात मतदारांचा कौल `फिप्टी-फिप्टी`, देशमुख-निलंगेकरांनी गड राखले..

Market Committee : भाजपाने पाच तर एकट्या काॅंग्रेसने दोन आणि आघाडीने तीन ठिकाणी विजय मिळवला.
Mla Sambhaji Patil Nilangekar-Amit Deshmukh, Latur
Mla Sambhaji Patil Nilangekar-Amit Deshmukh, LaturSarkarnama

Marathwada : कधीकाळी संपुर्ण जिल्ह्यावर वर्चस्व राहिलेल्या काॅंग्रेसने नुकत्याच झालेल्या बाजार समितीत लातूर, (Latur District APMC News) रेणापूरमध्ये विजय मिळवला. देशमुख बंधुंनी या दोन्ही बाजार समित्यांमध्ये सर्वच्या सर्व जागा जिंकत वर्चस्व सिद्ध केले. पण जिल्ह्यातील इतर तालुक्यात मात्र त्यांना निलंगेकर बंधूंनी रोखले. महाविकास आघाडीच्या वाट्याला उदगीर, जळकोट, अहमदपूर बाजार समित्या आल्या.

Mla Sambhaji Patil Nilangekar-Amit Deshmukh, Latur
Sachin Ahir In kannad News : कन्नड शिवसेनेचा बालेकिल्लाच ; अहिरांनी घातली आमदारांच्या दुःखावर फुंकर..

सहकार क्षेत्रावर वर्षानुवर्ष असलेली काॅंग्रेसची पकड सैल झाल्याचे दाखवणारा जिल्ह्यातील बाजार समित्यांचा निकाला होता. संख्येचा विचार केला तर मतदारांनी (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडी आणि भाजप-युतीला `फिप्टी फिप्टी`, असे यश दिले आहे. मात्र काॅंग्रेसची सहकार क्षेत्रावरील पकड निसटत असल्याचे देखील या निकालातून समोर आले आहे.

निलंगा, औरादशहाजानी, औसा, चाकूर व देवणी या पाच बाजार समित्यावर भाजपने सत्ता मिळवली आहे. निलंगेकर (Sambhajipatil Nilangekar) यांनी या निवडणुकीत स्वःबळावर मिळवलेले यश त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना खुपणारे आहे. (Amit Deshmukh) आमदार अभिमन्यू पवार, संभाजी पाटील निलंगेकर यांच्यात अजूनही सुप्त संघर्ष सुरू असल्यामुळे भाजपला जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये फटका बसला. गेल्या

अनेक वर्षापासून सहकारी संस्था काँग्रेसच्या तर काही ठिकाणी राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. असे असतानाही जिल्ह्यातील दहा पैकी निम्यावर भाजपने वर्चस्व मिळवले. (Latur) अतिआत्मविश्वासात असलेल्या काँग्रेस व महाविकास आघाडीला याचा फटका बसला. भाजपाने पाच तर एकट्या काॅंग्रेसने दोन आणि आघाडीने तीन ठिकाणी विजय मिळवला.

सहकार क्षेत्रातील ठराविक असलेल्या मतदारांनी निवडणुकीत भाजपला मोठ्या मताधिक्याने निवडून दिल्याने गेली अनेक वर्ष पकड असलेल्या काँग्रेसच्या सहकार क्षेत्राला सुरूंग लागला आहे. गावपातळीवर सक्षम असणाऱ्या सहकार क्षेत्रावर काँग्रेसची मजबूत पकड असताना काही बाजार समित्याचे धक्कादायक निकाल लागले.

Mla Sambhaji Patil Nilangekar-Amit Deshmukh, Latur
BRS Meeting Fof Assembly Election News : बीआरएस महाराष्ट्रातील २८८ विधानसभेच्या जागा लढवण्याच्या तयारीत..

दिवंगत विलासराव देशमुख, शिवाजीराव पाटील निलंगेकर, शिवराज पाटील चाकूरकर यांनी सहकार क्षेत्रात मोठा दबदबा कायम ठेवला होता. अनेकवेळा बाजार समित्या व सोसायटीच्या निवडणूकाच होत नसायच्या. मात्र राज्य सरकारने सहकार क्षेत्रातील निवडणुकीसाठी स्वतंत्र प्राधिकरण निर्माण केल्याने निवडणूका होऊ लागल्या.

माजीमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज संस्था निवडणूकीत जिल्हापरिषद, महानगरपालिका, नगरपंचायती,पंचायत समित्या ताब्यात घेतल्या. त्यानंतर दहा बाजार समित्यांच्या निवडणूकीतही त्यांनी आपल्या नेतृत्वाची चमक दाखवली. लातूर, रेणापूरमध्ये आमदार अमित देशमुख, धिरज देशमुख यांची एकहाती सत्ता आली. तर जळकोट, उदगीर व अहमदपूर महाविकास आघाडीने जिंकले. तर निलंगा, औसा, औरादशहाजानी, देवणी, चाकूर या बाजार समितीमध्ये भाजपा व शिंदे गटाने बाजी मारली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com