MP Imtiaz Jalil On Railway Minister: रेल्वेचा थांबा मिळत नसेल तर रावसाहेब दानवेंच्या मंत्रीपदाचा काय फायदा ?

AIMIM News : विरोधी पक्षात असले तरी इम्तियाज जलील आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यात चांगले संबंध आहेत.
Mp Imtiaz Jalil ON Railway Minister News
Mp Imtiaz Jalil ON Railway Minister NewsSarkarnama

Aurangabad Political News : मराठवाड्याकडे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री पद असतांना रेल्वे थांबा देण्याची छोटीशी मागणी पुर्ण होत नसेल तर या मंत्रीपदाचा फायदा काय? असा संतप्त सवाल खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. रेल्वे कोणासाठी आहे? रेल्वे विभागाला फक्त व्यवसाय करायचा आहे ? गोरगरीबांशी काहीच देणे-घेणे नाही का? असा संताप देखील इम्तियाज यांनी व्यक्त केला.

Mp Imtiaz Jalil ON Railway Minister News
MP Imtiaz Jalil News: ठेवीदारांचे पैसे मिळवून देण्याची इम्तियाज यांनी घेतली शपथ..

संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील परसोडा व इतर ठिकाणी रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा अशी मागणी कामगार, शेतकरी बांधव, ग्रामस्थ व विविध संघटनांनी केली होती. (Aimim) अनेकदा निवेदन देऊन सुध्दा रेल्वे विभागाने याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांची भेट घेऊन रेल्वे प्रवाशांची होणारी गैरसोय व व्यथा मांडली होती.

याची गंभीर दखल घेत इम्तियाज यांनी रेल्वे विभागाला पत्र लिहून प्रवाशांच्या मागणीप्रमाणे रेल्वे थांबा व इतर सुविधा पुरवण्याची मागणी केली होती. (Railway) परंतु दक्षिण रेल्वे विभागाचे मुख्य व्यवस्थापक अरुण कुमार जैन यांनी तेज कनेक्टिविटी व रेल्वेच्या उत्पन्नाचा मुद्दा पुढे करत ग्रामीण भागात रेल्वे थांबा देण्यास स्पष्ट नकार दिला. तसे पत्रच खासदार इम्तियाज यांना पाठवले.

धर्माबाद- मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस, निजामाबाद-पूणे, हैदराबाद-औरंगाबाद आणि पूर्णा- हैदराबाद रेल्वे गाड्यांना परसोडा व इतर ठिकाणी थांबा देणे गरजेचे आहे. कोरोना काळापूर्वी रेल्वे ग्रामीण भागात विविध ठिकाणी थांबत होत्या. यापूर्वी कोरोनाचे कारण देत रेल्वे विभागाने ग्रामीण भागातील थांबे बंद केले. कोरोना परिस्थिती पूर्णपणे संपल्यानंतर रेल्वेगाड्या पूर्ववत ग्रामीण भागात थांबविणे आवश्यक होते. परंतु तसे न करता थेट ग्रामस्थांची मागणी रेल्वे विभागाने फेटाळून लावली. याबद्दल इम्तियाज जलील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत मराठवाड्याकडे रेल्वे मंत्रीपद असण्याचा फायदा काय? असा सवालही केला आहे.

विशेष म्हणजे विरोधी पक्षात असले तरी इम्तियाज जलील आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यात चांगले संबंध आहेत. नुकत्याच झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत देखील या दोघांमधील छुप्या प्रेमाची प्रचिती सर्वांना आली होती. भाजपचा खासदार निवडून आणायचा असेल तर आम्हाला इम्तियाज जलील यांना उभे करावेच लागेल, असे म्हणत दानवे यांनी खळबळ उडवून दिली होती. मग एवढे मैत्रीपुर्ण संबंध असतांना इम्तियाज जलील यांनी रेल्वे विभागाकडे केलेल्या छोट्याश्या मागणीला केराची टोपली का दाखवण्यात आली? असा प्रश्न देखील उपस्थितीत केला जात आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com