Amit Deshmukh : लातूर पॅटर्नचे खरे शिल्पकार माजी खासदार गोपाळराव पाटीलच, अमित देशमुखांकडून जुन्या आठवणींना उजाळा!

Amit Deshmukh on former MP Gopalrao Patil : माजी खासदार गोपाळराव पाटील यांना लातूर पॅटर्नचे खरे शिल्पकार म्हणत अमित देशमुख यांनी त्यांच्या कार्याची आणि योगदानाची आठवण करून दिली.
Amit Deshmukh
Amit DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Latur Political News : लातूरचे माजी खासदार डाॅ. गोपाळराव पाटील यांचे दुःखद निधन झाले. लातूरच्या राजकीय, समाजिक, वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर राहिलेल्या पाटील यांना श्रद्धांजली वाहताना काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी गोपाळराव पाटील हेच लातूर पॅटर्नचे खरे शिल्पकार असल्याची भावना व्यक्त केली.

शिक्षणमहर्षी उपाधीसाठी समर्पक ठरावे असे महान कार्य त्यांच्या हातून घडले. शिक्षण क्षेत्रातील थोर मार्गदर्शक आणि तत्त्वज्ञ, ज्येष्ठ बालरोग तज्ञ, माजी खासदार, लातूर मधील नामवंत शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, आदरणीय डॉ. गोपाळराव पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखदायक असल्याचे देशमुख म्हणाले.

Amit Deshmukh
Pune news IT sector controversy : नाशिकनंतर पुण्यातही 'त्या' घटनेची पुनरावृत्ती! आयटी कंपनीतील प्रकारामुळे खळबळ, राज्यमंत्र्यांच्या पोलिसांना कारवाईच्या सूचना

अत्यंत निस्वार्थ भावनेने, वैद्यकीय, शिक्षण, सामाजिक अशा विविध क्षेत्रात अनेक दशके कार्यरत राहिलेले ज्येष्ठ नेते आदरणीय डॉ. गोपाळराव पाटील, जुने जाणते, समाजाभिमुख व्यक्तिमत्व होते. लातूर शहरात जुन्या पिढीतील बालरोग तज्ञ म्हणून ते सुपरचित राहिले. लातूर-धाराशिव जिल्ह्यातील जनतेची त्या काळातील आर्थिक स्थिती लक्षात घेऊन त्यांनी अत्यंत कमी शुल्कात वैद्यकीयसेवा केली.

पुढे शिवछत्रपती शिक्षण संस्थेची जबाबदारी त्यांच्याकडे आल्यानंतर, अत्यंत प्रमाणिकपणे आणि निष्ठेने त्यांनी शिक्षण क्षेत्रात कार्य केले. शिवछत्रपती शिक्षण संस्थेमार्फत चालणारे राजर्षी शाहू महाविद्यालय, जिजामाता विद्यालय, यशवंत विद्यालय, संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूल या व इतर शाळा महाविद्यालयातून त्या नावांना शोभेल अशा पद्धतीने त्या महान व्यक्तींच्या विचारांची शतप्रतिशत अंमलबजावणी त्यांनी केली.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सहजगत्या उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देत त्यांनी राजर्षी शाहू महाविद्यालयाची कीर्ती महाराष्ट्र, देश आणि जागतिक पातळीवर पोहोचवली. या महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी दरवर्षी वैद्यकीय महाविद्यालये, आणि नामवंत अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवत आहेत, स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊन विविध प्रशासकीय पदांचे मानकरी ठरत आहेत. शिक्षण संस्थेतील सर्वच शाळा महाविद्यालयाच्या यशाचा हा आलेख अनेक वर्षापासून वाढतोच आहे.

या शिक्षण संस्थेच्या शाळा महाविद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले हजारो उच्चशिक्षित तरुण आज जगभरात उच्च पदावर कार्यरत आहेत. जगभरात लौकिक असलेल्या लातूर शैक्षणिक पॅटर्नचे खरे शिल्पकार हे आदरणीय डॉ. गोपाळराव पाटील ठरतात, असेही देशमुख म्हणाले. भारतीय संसदेच्या सर्वोच्च सभागृहात म्हणजे राज्यसभेत डॉ. गोपाळराव पाटील यांना खासदार म्हणून जाण्याची संधी मिळाली तेव्हा त्या सभागृहाला साजेल असे कार्य त्यांच्या माध्यमातून घडले आहे. अत्यंत अभ्यासू खासदार म्हणून तेथेही त्यांनी लौकिक मिळवला होता.

Amit Deshmukh
Sushma Andhare : "तुम्ही महिलांना तुच्छ लेखता..."; फडणवीसांवर सुषमा अंधारेंची जोरदार टीका

आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्याशी त्यांचे अत्यंत स्नेहाचे संबंध होतेच, त्याच बरोबर, लातूरच्या शैक्षणिक, सामाजिक जडणघडणीत उभय नेत्यांमध्ये नेहमी विचारविनिमय आणि चर्चा होत असत. डॉ गोपाळराव पाटील यांच्या सूचनांचा स्वीकार करून आदरणीय साहेबांनी लातूर मधील अनेक शैक्षणिक, सामाजिक प्रकल्पासाठी महाराष्ट्र आणि केंद्र शासनाच्या मार्फत सोयी सुविधा उभारल्या आहेत. आदरणीय डॉ. गोपाळराव पाटील यांचे वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक या सर्व क्षेत्रातील कार्य आणि विचार कायम दीपस्तंभ म्हणून प्रेरणादायी आणि अनुकरणीय राहतील, अशा शब्दात अमित देशमुख यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com