Pune news IT sector controversy : नाशिकनंतर पुण्यातही 'त्या' घटनेची पुनरावृत्ती! आयटी कंपनीतील प्रकारामुळे खळबळ, राज्यमंत्र्यांच्या पोलिसांना कारवाईच्या सूचना

Pune IT company incident latest news : नाशिकनंतर पुण्यात आयटी कंपनीत घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर राज्य मंत्र्यांनी तातडीने पोलीस कारवाईचे आदेश दिले असून, कामाच्या ठिकाणच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Pune IT company incident latest news
Pune IT company incident latest news Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : नाशिकमधील नामांकित आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरण नुकतेच समोर आलं आहे. या प्रकरणामुळे राज्यसह देशातील राजकारण तापलं असताना पुण्यातील आयटी कंपनीमध्ये सुरू असलेल्या धार्मिक प्रकाराबाबत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून माहिती दिली आहे.

नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुण्यातील आयटी हब असलेल्या हिंजवडी परिसरातील बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील विश्रांती कक्षांच्या वापराबाबत आलेल्या गंभीर तक्रारींकडे लक्ष दिले आहे. या संदर्भात त्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

Pune IT company incident latest news
Dr Gopalrao Patil Passes Away : 'लातूर पॅटर्न'चे शिल्पकार माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन; परिसरात शोककळा

माधुरी मिसाळ यांनी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मला विविध स्रोतांद्वारे प्राप्त झालेल्या माहितीनुसार, एका नामांकित मल्टिनॅशनल कंपनीतील कार्यालयात पुरुष विश्रांती कक्ष (resting rooms) यांच्या वापराबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. काही विशिष्ट गटाकडून धार्मिक विधींसाठी या कक्षाचा नियमित वापर केला जात असल्याचे सांगितले जाते आणि त्या वेळेत इतर कर्मचाऱ्यांना प्रवेश मर्यादित केला जात असल्याची बाबही निदर्शनास येत आहे.

यामुळे कार्यस्थळी उपलब्ध सुविधांचा समसमान वापर, कर्मचाऱ्यांचे हक्क आणि संस्थात्मक शिस्त यावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. वरील माहिती ही अद्याप अधिकृतरीत्या पडताळलेली नसून, तिची सत्यता तपासणे अत्यावश्यक आहे.

विशेषतः महिला कर्मचाऱ्यांशी स्वेच्छेने व गोपनीयतेने काउन्सलिंग/संवाद साधणे, त्यांना कोणत्याही प्रकारचा दबाव, छळ किंवा असुविधा भासत आहे का याची पडताळणी करणे आवश्यक आहे.तरी सदर विषय संवेदनशील असल्याने, आपण या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी अशी सूचना या पत्राद्वारे मिसळ यांनी दिली आहे.

Pune IT company incident latest news
Sushma Andhare : "तुम्ही महिलांना तुच्छ लेखता..."; फडणवीसांवर सुषमा अंधारेंची जोरदार टीका

याबाबत माधुरी मिसाळ म्हणाल्या, पुण्यातील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीतील विश्रांती कक्षाचा वापर धार्मिक विधींसाठी करून इतर कर्मचाऱ्यांना प्रवेश नाकारला जात असल्याच्या तक्रारी चिंताजनक आहेत.

कार्यस्थळी भेदभाव, बळजबरी किंवा नियमभंग कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. पुणे पोलिस आयुक्तांना सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाईचे निर्देश दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com