Sushma Andhare : "तुम्ही महिलांना तुच्छ लेखता..."; फडणवीसांवर सुषमा अंधारेंची जोरदार टीका

Sushma Andhare statement on women respect : महिलांबाबतच्या वक्तव्यावर सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली असून महाराष्ट्रात राजकीय वाद पेटला आहे. सविस्तर बातमी वाचा.
Shiv Sena (UBT) leader Sushma Andhare
Shiv Sena (UBT) leader Sushma Andhare Sarkarnama
Published on
Updated on

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून तीव्र टीका केली आहे. फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत विरोधकांवर आरोप करत महिला आरक्षण विधेयक मंजूर न होण्यास त्यांना जबाबदार ठरवले होते. तसेच, या विषयावर खुल्या चर्चेचे आव्हानही त्यांनी दिले होते. सुषमा अंधारे यांनी फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केलीय.

या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी त्यांच्या विधानांवर फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केलीय. सुषमा अंधारे म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस यांनी 2023 मध्ये ट्विट केलं होतं, त्या ट्विटचा अर्थ काय घ्यायचा? त्यात त्यांनी ऐतिहासिक क्षण असं लिहिलं होतं, असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट वाचून दाखवलं. हे काय होतं हे फडणवीस यांनी समजावून सांगावं. जर आता तुम्ही म्हणत असाल की विरोधकांमुळे विधेयक पडलं तर या ट्विटचा अर्थ काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला

Shiv Sena (UBT) leader Sushma Andhare
Dr Gopalrao Patil Passes Away : 'लातूर पॅटर्न'चे शिल्पकार माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन; परिसरात शोककळा

अंधारे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या 2023 मधील विधानाचाही उल्लेख केला. त्या म्हणाल्या की, त्यावेळी संसदेत विधेयक मंजूर झाल्याचे सांगण्यात आले होते. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यासंदर्भात सकारात्मक भूमिका मांडली होती. त्यामुळे नेमके सत्य काय आहे, हे जनतेसमोर स्पष्ट व्हावे, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी सुषमा अंधारे यांनी ‘भ्रूण हत्या’ या शब्दाच्या वापरावरही आक्षेप घेतला. त्यांनी सांगितले की,सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या की, काल विधेयकाची भ्रूण हत्या झाली, असं फडणवीस म्हणाले. भ्रूण हत्या हा शब्द त्यांनी वापरला. त्यांना या शब्दाचा अर्थ कळला नसेल, त्यांना या शब्दाचं गांभीर्य नाही. सगळ्यात आधी महिला आरक्षणाची भ्रूण हत्या 1951 मध्ये झाली.

या विधेयकाला कोणी त्यावेळी विरोध केला. याला शामा प्रसाद मुखर्जी आणि मदन मोहन मालवीय यांनी विरोध केला होता. बाबासाहेब हे बिल मांडत होते, त्यावेळी या लोकांनी कडाडून विरोध केला होता. त्यानंतर 1951 मध्ये बाबासाहेबांनी राजीनामा दिला होता. देवेंद्र फडणवीस साहेब तुमची तयारी आहे का? मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायची? तेही महिलांसाठी... डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केंद्रात राजीनामा दिला होता, असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.

Shiv Sena (UBT) leader Sushma Andhare
Indian Army news : भारतीय लष्कराचा पाकिस्तानला कडक इशारा; काही सीमा कधीच ओलांडायच्या नसतात, भारत...

अंधारे यांनी थेट प्रश्न विचारत म्हटले की, महिलांच्या प्रश्नासाठी तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार आहात का? त्यांनी फडणवीस यांच्यावर महिलांचा अपमान केल्याचा आरोपही केला. विशेषतः सुप्रिया सुळे आणि प्रणिती शिंदे यांच्या मतांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे महिलांना कमी लेखणे, असे त्यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com