Latur Political News : 'दो हंसो का जोडा' अशी राजकारणात ओळख असलेल्या दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख या निखळ मैत्री जपणाऱ्या दोन नेत्यांसाठी आज खास दिवस. लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचे आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण होत आहे. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या शेजारीच हा पुतळा उभारण्यात आला आहे.
या निमित्ताने आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी गोपीनाथ मुंडे- विलासराव देशमुख यांच्या निखळ मैत्रीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. सामाजिक व राजकीय कर्तव्य सांभाळत या दोन नेत्यांनी जपलेली मैत्री म्हणजे एक लातूर पॅटर्नच असल्याचे अमित देशमुख म्हणाले. लातूरकरांनी या दोन नेत्यांचे पुतळे एकाच कार्यालयाच्या प्रांगणात शेजारी शेजारी उभारून एक आगळावेगळा इतिहास रचला आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या, माजी केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या पुतळ्याचे अनावरण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या हस्ते व मान्यवरांचे उपस्थितीत होत आहे, या कार्यक्रमास माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा, लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात यापूर्वी उभारण्यात आलेल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या पुतळ्याशेजारीच आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या पुतळ्याचे अनावरण होत आहे.
या दोन्ही नेत्यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपली कारकीर्द गाजवलेली आहे. सर्वात महत्त्वाचे या दोन्ही नेत्यांचे राजकीय पक्ष वेगळे असतानाही त्यांच्यातली मैत्री सर्वश्रुत होती. आपले राजकीय आणि सामाजिक कर्तव्य सांभाळून त्यांनी निखळ मैत्रीचे नाते जपले होते. त्यांच्या आदर्श मैत्रीची 'मिसाल' लक्षात घेऊन लातूरकरांनी या दोन नेत्यांचे पुतळे एकाच कार्यालयाच्या प्रांगणात शेजारी शेजारी उभारून एक आगळावेगळा इतिहास रचला आहे. खरे तर हाही एक देशात अनुकरणीय ठरावा असा लातूर पॅटर्नच म्हणता येईल.
आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि आदरणीय गोपीनाथराव मुंडे साहेब हे थोर लोकनेते होते, ते परस्परांचे मित्र होते त्याचप्रमाणे, मुंडे आणि देशमुख कुटुंबीयांचाही परस्परांशी स्नेह होता आणि आजही तो कायम आहे, भविष्याठी तो कायम राहील हा विश्वास आहे. लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणातील लोकनेत्यांची ही दोन्ही स्मारके येणाऱ्या प्रत्येक पिढीला राजकारणविरहित समाजकारण आणि लोकसेवा करण्याची प्रेरणा देत राहतील, असा विश्वासही अमित देशमुख यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.