Pankaja Munde Dasara Melawa : `आहे की नाही माझ्यापेक्षा उंच` पंकजा मुंडेंचा मुलगा आर्यमनची व्यासपीठावर एन्ट्री

Gopinath Munde's third generation Aryaman's entry on the political platform : आर्यमन मुंडेंच्या निमित्ताने दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची तिसरी पिढी राजकारणात उतरणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. भगवान भक्तीगडावर व्यासपीठावर दिसलेला आर्यमन मुंडे यापुढेही राजकीय कार्यक्रमांमध्ये दिसणार का?
Pankaja Munde With Son Aryaman News
Pankaja Munde With Son Aryaman NewsSarkarnama
Published on
Updated on

Beed Political News : बीडसह राज्यात होणाऱ्या दसऱ्या मेळाव्यांकडे सगळ्यांचे लक्ष लागले असताना बीडमधील भगवान भक्तीगडावर पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या दसरा मेळाव्यात आज एका नव्या मुंडेंची एन्ट्री झाली. पंकजा मुंडे यांचा मुलगा आर्यमन आज पहिल्यांदा दसरा मेळाव्याला हजर होता. विशेष म्हणजे पकंजा मुंडे यांनी त्याला व्यासपीठावर आधी उभे राहयला सांगितले.

नंतर पुढे बोलवत आहे की नाही माझ्यापेक्षा उंच, गोरा, गोड माझा मुलगा आर्यमन भगवानबाबांचे दर्शन घ्यायला आला होता, असे सांगत उपस्थितांना त्याची ओळख करून दिली. या निमित्ताने मुंडे घराण्यातील आणखी एका नव्या चेहऱ्याची राजकीय व्यासपीठावर एन्ट्री झाल्याचे पहायला मिळाले. लोकसभा निवडणुकीतील पराभव, विधान परिषदेवर मिळालेली संधी आणि बारा वर्षानंतर पकंजा मुंडे (Pankaja Munde) यांचे भाऊ आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची दसरा मेळाव्याला हजेरी यामुळे हा मेळावा विशेष ठरला.

या शिवाय ज्यांच्या उपोषण आणि आंदोलनामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाल्या अशा प्रा. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे या ओबीसी आंदोलकांच्या व्यासपीठावरील उपस्थितीने अनेकांच्या भवुया उंचावल्या गेल्या. नारायण गडावर मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा पहिला दसरा मेळावा झाला. भगवान भक्तीगडावर मुंडे बहिण भावांचा तर नारायण गडावर मनोज जरांगे पाटील यांच्या मेळाव्याने या दोन्ही मेळाव्यांना ओबीसी विरुद्ध मराठा असेच स्वरुप प्राप्त झाले होते.

Pankaja Munde With Son Aryaman News
Dasara Melava 2024 : जरांगेंचा नारायणगडावर, तर पंकजा मुंडेंचा भगवानगडावर मेळावा; राजकीय दिशा ठरणार?

दोन्ही मेळाव्यांना लाखोंची गर्दी जमली होती. पंकजा मुंडे यांनी भाषणाला सुरवात करण्याआधी व्यासपीठावर उपस्थित सगळ्या जाती-धर्माच्या नेते, लोकप्रतिनिधी, आमदार यांची ओळख करून दिली. याच राजकारण्यांच्या पंगतील पंकजा मुंडे यांचा मुलगा आर्यमन देखील बसला होता. (Beed) तेव्हा पकंजा मुंडे यांनी आर्यमनला उभे राहिला सांगितले. त्यानेही हात जोडत उपस्थितीत गर्दीला अभिवादन केले. पण पंकजा यांनी त्याला समोर बोलावून घेत आपल्या शेजारी उभे केले.

आहे की नाही माझ्यापेक्षा उंच, हा माझा मुलगा आर्यमन आहे. तो भगवानबाबांच्या दर्शनाला आला होता, असे म्हणत त्याची ओळख करून दिली. अवघ्या काही सेकंदाच्या या प्रसंगाने आर्यमन मुंडेंच्या निमित्ताने दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची तिसरी पिढी राजकारणात उतरणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

Pankaja Munde With Son Aryaman News
Beed Politics : कमळाचं देठ खुडून निवडणूक लढविणार नाही म्हणणारे, भाजप आमदार 'तुतारी'च्या संपर्कात

भगवान भक्तीगडावर व्यासपीठावर दिसलेला आर्यमन मुंडे यापुढेही राजकीय कार्यक्रमांमध्ये दिसणार का? तो ही आजोबा, आई, मावशी, मामा यांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात उतरतो का? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com