Maratha Reservation: सरकारच्या शिष्टमंडळाकडून पुन्हा चालढकल, मराठा आंदोलक जरांगे पाटलांनी अखेर कठोर निर्णय घेतलाच

Maratha Reservation News: दोन दिवसांपूर्वी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी पुन्हा त्यांची भेट घेत सरकारकडून सुरू असलेल्या कारवाईची माहिती देत त्यांच्या मागण्यावर सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा शनिवारी(ता.5) आठवा दिवस आहे.
Manoj Jarange Patil.jpg
Manoj Jarange Patil.jpgSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation: भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणा दरम्यान, त्यांची भेट घेतली. खालावलेली प्रकृती पाहता जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर तात्काळ कारवाई सुरू करून मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी त्यांच्याच हस्ते हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र वाटप केले जाईल, असा सरकारच्या वतीने शब्द दिला. त्यामुळे जरांगे पाटील यांनी लाड यांच्या विनंतीला मान देत पाणी घेतले आणि सलाईन लावून घेण्याची तयारी दर्शवली.

दोन दिवसांपूर्वी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी पुन्हा त्यांची भेट घेत सरकारकडून सुरू असलेल्या कारवाईची माहिती देत त्यांच्या मागण्यावर सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा शनिवारी(ता.5) आठवा दिवस आहे. मात्र माघारी गेलेल्या सरकारच्या शिष्टमंडळाकडून पुन्हा चालढकल सुरू असल्याचा आरोप करत जरांगे पाटील यांनी केला.

तसेच आजपासून पुन्हा पाणी, सलाईन व वैद्यकीय उपचार न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाने सरकारचे टेन्शन वाढणार असून हे आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनाची मुदतीत पूर्तता न केल्यामुळे आपण पाणी, सलाईन न घेण्याचा निर्णय घेतल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आलेल्या डॉक्टरांनाही त्यांनी माघारी पाठवले.

काही प्रमुख मागण्या दोन दिवसांत पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन राज्यातील महायुती सरकारने जरांगे पाटील यांना दिले होते. मात्र, दिलेल्या वेळेत सरकारने कोणतीही ठोस पावले न उचलल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. जोपर्यंत आमच्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी सरकारकडून प्रत्यक्षात होत नाही, तोपर्यंत मी काहीही घेणार नाही आणि उपचारही करून घेणार नाही, असे जरागें पाटील यांनी वैद्यकीय तपासणीसाठी आलेल्या पथकाला सांगितले.

Manoj Jarange Patil.jpg
Nitin Gadkari : दिल्लीच्या राजकारणातील महाराष्ट्राचा ‘वजनदार’ चेहरा : विरोधकही ऐकतात, सत्ताधारीही मानतात...

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे. मंत्र्यांच्या शिष्टमंडळाची शिष्टाई यशस्वी न झाल्याने जरांगे यांचे उपोषण सुरूच आहे. सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय उपोषण मागे न घेण्याचा निर्धार जरांगेनी केला आहे. दरम्यान, जरांगेच्या मागण्यांवर एक ते दोन दिवसात निर्णय कळवू अशी भूमिका शिष्टमंडळाने जाहीर केली आहे.

विखेंना धक्का..

दरम्यान, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जरांगे पाटील यांच्या पाणी आणि सलाईन न घेण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया आली आहे. जरांगे पाटील यांच्या या निर्णयाने आपल्याला धक्का बसला आहे. दोन दिवसांपूर्वी आम्ही त्यांची भेट घेऊन सरकार घेत असलेल्या निर्णायाची माहिती दिली होती. पुन्हा आमचे अधिकारी आम्ही अंतरवाली सराटीमध्ये पाठवू. जरांगे पाटील यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, असेही विखे पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com