मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी राज्यातील महायुती सरकारचे आभार मानले आहेत. सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक दिवंगत नितीन देसाई यांचा एन.डी. स्टुडिओ शासनाने ताब्यात घेऊन त्याचे जतन करावे, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी विधिमंडळ अधिवेशनात केली होती.
अखेर या संदर्भातला निर्णय घेण्यात आला असून आपल्या मागणीला यश आल्याबद्दल अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी महायुती सरकारचे आभार 'एस्क' वर पोस्ट करत मानले आहे. सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी गतवर्षी आत्महत्या केली होती.
एन.डी. स्टुडिओ हा त्यांच्या जीवनातील महत्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी कर्जत येथे उभारला होता. या प्रकल्पावर मोठे कर्ज होते. (Mahayuti) मात्र त्यांच्या मृत्युनंतर या स्टुडिओचा लिलाव न होऊ देता शासनाने तो ताब्यात घ्यावा, अशी मागणी 3 ऑगस्ट 2023 रोजी आम्ही विधानसभेत केली होती.
त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कायदेशीर बाबी तपासून याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे घोषित केले होते. मी महायुती सरकारचा मनःपूर्वक आभारी आहे की नितीन देसाईंसारख्या प्रतिभाशाली, प्रख्यात मराठी कलावंताने अतिशय मेहनतीने उभारलेला एन.डी. स्टुडिओ शासनाच्या ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला.
त्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी काल महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाकडे देण्यात आली. नितीन देसाईंना ही खरी आदरांजली असून, या माध्यमातून त्यांची आठवण जपली जाणार आहे, असे चव्हाण यांनी म्हटले आहे. नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर रंगभूमी आणि हिंदी, मराठी चित्रपटसृष्टी हळहळली होती. कर्ज फेडण्यासाठी देसाई यांच्यावर प्रचंड दबाव होता. यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.