Mahayuti Politics : एकनाथ शिंदेंच्या नाराजीचं कारण काय? भरत गोगावलेंच्या बोलण्यातून झालं स्पष्ट

Mahayuti Government Formation News : दोन दिवसांपूर्वी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन आपला मुख्यमंत्रिपदावर दावा नसल्याचं स्पष्ट केलं होतं. शिवाय सरकार स्थापन करण्यात आपला कोणताही अडसर राहणार नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह घेतील तो निर्णय आपल्याला मान्य असेल असंही स्पष्ट केलं होतं.
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Bharat Gogawle
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Bharat GogawleSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 30 Nov : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरीही अद्याप महायुती (Mahayuti) सरकारचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आणि शपथविधीचा मुहूर्त ठरलेला नाही. नुकतंच दोन दिवसांपूर्वी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन आपला मुख्यमंत्रिपदावर दावा नसल्याचं स्पष्ट केलं होतं.

शिवाय सरकार स्थापन करण्यात आपला कोणताही अडसर राहणार नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह घेतील तो निर्णय आपल्याला मान्य असेल असंही स्पष्ट केलं होतं. मात्र, अशातच आता पुन्हा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाराज असल्याचं समोर आलं आहे. मात्र, यावेळी ते मुख्यमंत्रिपदासाठी नव्हे तर गृहमंत्रिपदासाठी नाराज असल्याची चर्चा आहे.

त्यांच्या याच नाराजीमुळे शुक्रवारी महायुतीची नियोजित बैठक देखील रद्द करावी लागली. तर शिंदे सध्या त्यांच्या साताऱ्यातील (Satara) दरे या मूळगावी गेले आहेत. एकनाथ शिंदे जेव्हा दरे गावात जातात, तेव्हा ते काहीतरी मोठा निर्णय घेतात असं मोठं वक्तव्य शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केलं आहे.

अशातच आता आमदार भरत गोगावले (Bharat Gogawle) यांच्या वक्तव्यामुळे शिंदे हे गृहखात्यासाठीच नाराज असल्याचं आणि ते या खात्यासाठी आग्रही असल्याचं स्पष्ट झालं आहे. शिंदे गट गृहखात्यासाठी आग्रही आहे का? असा प्रश्न विचारला असता गोगावले म्हणाले, "ज्यावेळी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते तेंव्हा त्यांच्याकडे गृह खात्याचा कारभार होता.

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Bharat Gogawle
Sharad Pawar : EVM मध्ये घोळ अन् 15 टक्के मतं सेट? मतमोजणी प्रक्रियेवर पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "शेवटच्या 2 तासांत..."

त्यामुळे आता ते मुख्यमंत्रिपद भाजपकडे (BJP) असेल तर आम्ही गृहमंत्रिपद मागतोय यात गैर काय आहे?" असं म्हणत त्यांनी शिंदे गट गृह खात्यावर ठाम असल्याचं स्पष्ट केलं असतं. दरम्यान, दिल्लीत ठरलेल्या सुत्रानुसार भाजपला 21, शिंदे गटाला 12 तर अजित पवारांना 10 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Bharat Gogawle
Murlidhar Mohol : महायुतीत मुख्यमंपत्रिदाचा तिढा अन् भाजपचं धक्कातंत्र! मोहोळ यांच्या ट्विटमुळे सगळंच झालं स्पष्ट

अशातच शिंदेंचा डोळा भाजप आणि अजित पवारांकडे असेलल्या मलईदार खात्यांवर असल्याची चर्चा सुरू आहे. त्यापैकी 2014 आणि सध्याच्या सरकारमध्ये भाजपकडे असलेलं गृहमंत्रिपदावर आता शिंदे गटाने दावा केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे भाजपश्रेष्ठी यावर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com