Nanded News : जनसंघ ते भाजपापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता, लोक आम्हाला चड्डीवाले, काळी टोपीवाले म्हणून हिणवायचे. पण आम्ही आमच्या ध्येयापासून कधी दूर हटलो नाही. अनेक कार्यकर्त्यांनी कष्ट केले, तपस्या केली तेव्हा आजचे दिवस दिसत आहेत, अशा शब्दात राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
दिवंगत डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त कुसुमताई चव्हाण पुरस्कार वितरण सोहळ्यात नांदेडमध्ये बागडे (Haribhau Bagde) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कारांचे वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. हिंदी भाषेवरून राज्यातील राजकारण पेटले असताना आपल्या भाषणात त्यांनी नेमके यावरच भाष्य करत हिंदी भाषेला विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांना खडेबोल सुनावले.
आपल्या देशात गुरुकुल पद्धतीत प्रत्येक विद्यार्थ्याला चार ते पाच भाषा येत होत्या. (BJP) छत्रपती संभाजी महाराजांनाही सोळा भाषा अवगत होत्या, मात्र आज तिसरी भाषा म्हणून हिंदीला होणारा विरोध दुर्दैवी असल्याचे सांगत राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी विरोधकांना सुनावले. याच कार्यक्रमात राज्यपाल बागडे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत जनसंघ ते भाजप अशा बदलावर भाष्य केले.
इतिहास आपोआप घडत नसतो तर तो ठेवावा लागतो. आम्ही लहानपणी सायकलवर फिरून प्रचार केला, सभेमध्ये सतरंज्या सुद्धा मिळत नव्हत्या. विरोधक आम्हाला चड्डीवाले, काळे टोपीवाले म्हणून हिणवत होते. पण आम्ही ध्येय गाठण्याच्या मार्गावरून हटलो नाही, वाटचाल करत राहिलो तेव्हा कुठे आज हे यश दिसत आहे. कार्यकर्त्यांनी प्रचंड कष्ट केले, तपस्या केली त्यातून पक्ष विस्तारला गेला असेही बागडे म्हणाले.
भाजप सोडून गेलेले लोक पुन्हा पक्षात परतत आहेत. तरुणांना जेष्ठांकडून मोठ्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत असेही राज्यपाल बागडे म्हणाले. दरम्यान, हरिभाऊ बागडे यांनी भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी अशोक चव्हाण व त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्याशी संवाद साधत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.