Governor of Rajasthan Haribhau Bagde : सहृदयी राज्यपाल हरिभाऊ बागडेंमुळे आंदोलकांवरील कारवाई टळली!

Due to the intervention of Governor Haribhau Bagde, action against the protesters was avoided : नाना आपण आमचे आमदार असतांना कधी असा प्रकार झाला नाही. कधी आमची घरे अतिक्रमणात नव्‍हती, आता ही कारवाई का ? अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. त्यामुळे कोणावरही कारवाई करू नका.
Governor of Rajsthan Haribhau Bagde News
Governor of Rajsthan Haribhau Bagade Newssarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar Political News : राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे याचा ताफा अडवणाऱ्या आंदोलकांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी काल दिले होते. आंदोलकांना शोधून शोधून त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हे दाखल करा, राज्यपालांचा ताफा अडवणाऱ्यांना सोडू नका, अशी आक्रमक भूमिका आयुक्तांनी घेतली होती.

परंतु ज्या मतदारसंघाचे अनेक वर्ष प्रतिनिधित्व केले, त्याच नागरिकांवर आपल्यामुळे गु्न्हे दाखल व्हावेत, हे काही राज्यपाल हरिभाऊ बागडे यांना पटले नाही. त्यांनी तात्काळ जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांना बोलावून घेत आंदोलकांवर कुठलीही कारवाई करू नका, असे आदेश दिले.

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरातील मुकुंदवाडी, संजयनगर भागात महापालिकेने दोन दिवसापुर्वी अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. यामध्ये अनेक घरं, दुकाने जमीनदोस्त करण्यात आली. कुठलीही पूर्वसूचना, नोटीस न देता पोलीस बंदोबस्तात महापालिकेने ही कारवाई केली, आमच्यावर बेघर होण्याची वेळ आली असा आरोप या भागातील नागरिक, व्यापार्‍यांनी केला. नागरीकांमध्ये प्रशासन, पोलीसांच्या विरोधात प्रचंड संताप असताना काल दुपारी माजी खासदार इम्तियाज जलील हे या भागात पाहणी आणि नागरीकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते.

लोकांच्या भावना तीव्र होत्या, आपल्यावर कसा अन्याय झाला हे सांगण्यासाठी महिला, लहान मुले, पुरूष, वृद्ध असे सगळेच रस्त्यावर जमा झाले होते. यावेळी रस्त्यावरच आंदोलन सुरू झाले आणि त्याच दरम्यान, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde) यांचा ताफा याच मार्गावरून आला.

कोणीतरी मंत्री आला असा आंदोलकांचा समज झाला आणि त्यांनी बागडे यांच्या गाडीसमोर येत ती अडवण्याचा प्रयत्न केला. महिला, मुले, तरुणांनी यावेळी घोषणाबाजी सुरु केली आणि रस्त्यावरच ठिय्या दिला.

Governor of Rajsthan Haribhau Bagde News
Imtiaz Jaleel : अतिक्रमण कारवाईवरून इम्तियाज जलील संतापले; पोलीस, मनपा प्रशासन नेत्यांच्या मर्जीवर चालणार का?

गाड्यांचा ताफा हा मंत्र्याचा नाही तर राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा असल्याचे बंदोबस्तावर असलेले पोलिस अधिकारी ओरडून सांगत होते. माजी खासदार इम्तियाज जलील यांनीही आंदोलकांना रस्त्यातून बाजूला व्हा, राज्यपालांचा ताफा पुढे जाऊ द्या, अशी विनवणी केली. बराच वेळ हा गोंधळ सुरू होता.

अखेर बऱ्याच प्रयत्नानंतर पोलीसांना आंदोलकांना बाजूला करत राज्यपालांच्या ताफ्याला मार्ग मोकळा करून देण्यात यश आले. परंतू राज्यपालांचा ताफा आंदोलकांनी अडवल्याची माहिती पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना समजताच ते घटनास्थळी तातडीने दाखल झाले.

Governor of Rajsthan Haribhau Bagde News
Haribhau Bagde News : राजकारणात संयम अन् आचार-विचारावर ताबा हवाच! राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा युवकांना सल्ला..

बंदोबस्तावर असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची त्यांनी खरडपट्टी काढली. राज्यपालांचा प्रोटोकाॅल तुम्हाला कळतो का? गाड्यांचा ताफा आंदोलकांनी अडवलाच कसा? तुम्ही काय करत होतात, सगळ्यांवर कारवाई केली जाईल.

राज्यपालांची गाडी अडवणाऱ्या आंदोलकांचा शोध घ्या, व्हिडिओ फुटेज तपासा, सगळ्यांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करा, कोणालाही सोडायचे नाही, असा इशारा देत कारवाईचे आदेश दिले. तिकडे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांना पोलीस आयुक्त आंदोलकांवर कठोर कारवाई करणार असल्याची माहिती मिळाली.

Governor of Rajsthan Haribhau Bagde News
Imtiaz Jaleel On Chhatrapati Sambhajinagar : 'छत्रपती संभाजीनगर' नावाला विरोध का? इम्तियाज जलीलांनी थेट पुणे, कोल्हापूर, नागपूरच्या नावात बदल सुचवला

यावर त्यांनी पोलीस आयुक्त प्रवीण पवार, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना फोन करून एकाही आंदोलकावर कारवाई करू नका, घरं, दुकाने उध्वस्त झाल्यामुळे, संसार उघड्यावर आल्याने त्यांचा रोष आणि संताप रास्त होता.

शिवाय ताफा राज्यपालांचा आहे, याची कल्पना आंदोलकांना नव्हती. कोणी तरी मंत्री आला आहे असे समजून त्यांनी गाड्या अडवल्या. नाना आपण आमच्या मतदार संघाचे आमदार असतांना कधी असा प्रकार झाला नाही. कधी आमची घरे अतिक्रमणात नव्‍हती,आता ही कारवाई का ? अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

Governor of Rajsthan Haribhau Bagde News
BJP Babanrao Lonikar allegation : 'तो' घोटाळा 100 कोटींच्या पुढचा; आमदार लोणीकर म्हणाले, 'भ्रष्ट अधिकाऱ्यांना तुरुंगात डांबण्याची वेळ'

त्यामुळे कोणावरही कारवाई करू नका, अशा सूचना हरिभाऊ बागडे यांनी पोलीस आयुक्तांना फोनवरून दिल्या. राज्यपालांचा आदेश आल्यानंतर आंदोलकांवरील कारवाई थांबवण्यात आली. पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी हरिभाऊ बागडे यांचे निवासस्थान गाठत त्यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली आणि झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करत त्यांचा निरोप घेतला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com