Imtiaz Jaleel : अतिक्रमण कारवाईवरून इम्तियाज जलील संतापले; पोलीस, मनपा प्रशासन नेत्यांच्या मर्जीवर चालणार का?

AIMIM MP Imtiaz Jaleel alleges that police and municipal officials acted under political influence during the encroachment removal : भाजपच्या नेत्याने एका अधिकाऱ्याला सांगितलं सगळ जमीनदोस्त करून टाका, मग प्रशासन नियमाप्रमाणे काम करणार ? की नेत्यांच्या मनाप्रमाणे काम करणार? एक नेता म्हणतो एफआयआर करा.
Imtiaz Jaleel News
Imtiaz Jaleel NewsSarkarnama
Published on
Updated on

Aimim News : छत्रपती संभाजीनगर शहरातील पोलीस प्रशासन आणि महापालिकेचे अधिकारीच गुंडासारखे वागू लागले आहेत. अतिक्रमण काढण्याची ही कुठली पद्धत. नोटीस नाही, सूचना नाही आणि थेट बुलडोझर फिरवला. पावसाळ्यात अतिक्रमित घरांवर कारवाई करू नये, असे सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश आहेत. ते देखील एका नेत्याच्या फोनवरून पोलिस आणि प्रशासनाने पायदळी तुडवले. तुम्ही नियमाप्रमाणे काम करणार की मग नेत्याच्या मनाप्रमाणे? असा सवाल इम्तियाज जलील यांनी उपस्थितीत केला.

मुकुंदवाडी भागात महापालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. यात शेकडो घरे, दुकाने जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईच्या विरोधात या भागातील लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. आज एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी या भागाला भेट देत तेथील नागरीक आणि छोटे मोठे व्यापारी, दुकानदारांशी चर्चा केली. भाजपा आमदाराने एक फोन केला आणि सगळं जमीनदोस्त करून टाका, असे फर्मान सोडले आणि ही कारवाई करण्यात आली, असा आरोप इम्तियाज यांनी केला.

नियम पाळून कारवाई झाली असती तर आमच काही म्हणणं नव्हत, अतिक्रमण पावसाळ्यात काढता येत नाही असे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहेत. पण आपण सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे झालो का? तुम्ही नियम पाळा आम्ही नियम पाळतो. (BJP) भाजपच्या नेत्याने एका अधिकाऱ्याला सांगितलं सगळ जमीनदोस्त करून टाका, मग प्रशासन नियमाप्रमाणे काम करणार ? की नेत्यांच्या मनाप्रमाणे काम करणार? एक नेता म्हणतो एफआयआर करा, दुसरा म्हणतो सगळ पडून टाका,नियम तुमच्यासाठी नाही का?

Imtiaz Jaleel News
Sanjay Shirsat-Imtiaz Jaleel : पराभवानंतर इम्तियाज जलील यांनी ब्लॅकमेलिंग सुरू केले! संजय शिरसाट यांचा आरोप

जाधवमंडीमध्ये अनधिकृत बांधकाम सुरू आहे. ही कारवाई केली तशी तिथे करू शकता का? मात्र तिथे मोठे नेते आहेत म्हणून कारवाई होत नाही. त्यांना नोटीस देता मग इथल्या लोकांना नोटीस द्यायला पाहजे होती, असेही इम्तियाज जलील म्हणाले. या निमित्ताने माझा महानगर पालिकेला प्रश्न आहे पैठण गेट ते गुलमंडीपर्यंत पार्किंग कुठे आहे? तिथे बेकायदा दुकाने थाटली गेली आहेत. तशीच परिस्थिती शहागंज ते सिटी चौकपर्यंत दिसते.

Imtiaz Jaleel News
Imtiaz Jaleel-Sanjay Shirsat : हाॅटेल खरेदीतून माघारीने संजय शिरसाट बॅकफूटवर! इम्तियाज जलील यांची सरशी..

मग फक्त गोरगरीब लोक राहतात तिथेच कारवाई होते का? निवडणुक काळात मतं मागायला येणाऱ्या नेत्या आता इथे यायला वेळ नाही, अशी टीकाही इम्तियाज यांनी केली. या अतिक्रमणाच्या कारवाईत राजकारण केले जात आहे. एका आमदाराने सांगितले तर सगळा पडून टाकता. मग मनपा, आयुक्तलय,पोलीस स्टेशन सगळ बंद करून नेत्यांच्या कार्यालयात जाऊन बसा, तुम्ही त्यांचंच ऐका, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

Imtiaz Jaleel News
BJP Babanrao Lonikar allegation : 'तो' घोटाळा 100 कोटींच्या पुढचा; आमदार लोणीकर म्हणाले, 'भ्रष्ट अधिकाऱ्यांना तुरुंगात डांबण्याची वेळ'

ज्या मुलाची हत्या झाली त्याचा आम्ही निषेध करतो. ज्याने हत्या केली त्याच्यावर कारवाई करा मात्र इतक लोकांना त्रास का देता? सुप्रीम कोर्टाने योगी सरकारवर ताशेर ओढले आहे. कोर्ट म्हणले लोकशाहीमध्ये बुलडोजर कल्चर चालणार नाही. गुंडांची दादागिरी बघितली आता पोलिस आणि प्रशासनाची दादागिरी या शहरात दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com