Governor Haribhau Bagde News : भाजपमध्ये पोस्टर अन् जाहिरातबाजी करून उमेदवारी मिळत नाही..

Governor Haribhau Bagde told how to get candidature in BJP : पक्षाचे चिन्ह प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचे ध्येय जनसंघाचे होते. ते काम करण्याची संधी मला मिळाली. त्यानंतर ज्या ठिकाणी कमी मताने पराभव झाला त्या मतदारसंघात तीन वर्ष अगोदरच जनसंघाने संघटन बांधणी केली.
Governor Haribhau Bagde
Governor Haribhau BagdeSarkarnama
Published on
Updated on

नवनाथ इधाटे

BJP Political News : राजस्थानचे राज्यपाल महामहिम हरिभाऊ बागडे यांचा संभाजीनगरचा दौरा चांगलाच चर्चेत आला आहे. राज्यपाल पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यादांच शहरात आणि आपल्या फुलंब्री मतदारसंघात परतलेल्या बागडेनानांनी आपल्या समर्थकांना काही मोलाचे सल्ले दिले. प्रामाणिकपणे काम करत राहा, तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळतेच, असे त्यांनी सांगितले.

आपल्यामुळे मतदारसंघातील इच्छुकांची होणारी अडचण आता सुटली असे सांगत सत्कार समारंभात चिमटे काढल्यानंतर पक्षातील पोस्टर अन् जाहीरातबाजी करणाऱ्यांनाही बागडेंनी कानपिचक्या दिल्या आहेत. सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे. इच्छुकांनी शक्तीप्रदर्शन, उमेदवारीसाठी लाॅबिंग सुरू केले आहे. अशावेळी भाजपमधील ज्येष्ठ आणि प्रचंड राजकीय अनुभव असणाऱ्या (Haribhau Bagde) हरिभाऊ बागडे यांनी इच्छुकांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या.

जाहिरातबाजी, पोस्टरबाजी करून भाजपध्ये कोणालाही उमेदवारी मिळत नाही. पक्षाकडून निवडणुकपुर्व केलेल्या सर्व्हेमध्ये जो सरस ठरेल त्यालाच पक्ष निवडणुकीत तिकीट देत असतो, असे स्पष्ट करत पोस्टर आणि जाहिरातबाजीतून चमकोगिरी करणाऱ्या पक्षातील समर्थकांना बागडेनाना यांनी उपदेशाचे चांगलेच डोस पाजले. जनसंघाचा कार्यकर्ता ते राज्यपाल असा प्रदीर्घ सामाजिक आणि राजकीय प्रवास करून राज्यपाल पदापर्यंत पोहचलेल्या हरिभाऊ बागडे यांनी `काॅफी विथ सकाळ` शी संवाद साधताना आपला जीवनपटच उलगडून सांगितला.

Governor Haribhau Bagde
Governoer Haribhau Bagde : `माझा तिहेरी सत्कार` हरिभाऊ बागडेंनी इच्छुकांना काढला चिमटा..

सुरुवातीला मी 1965 मध्ये विवेक साप्ताहिकाचा प्रतिनिधी झालो. त्यावेळी आठ पानांचे साप्ताहिक पोस्टाने पाठवायचो. यासाठी मराठवाडा, विदर्भ, खानदेश या भागातही मी काम केले. साखर उद्योग विशेष अंकासाठी मी 1967 मध्ये नगरला गेलो होतो. (BJP) त्यात तत्कालीन दिग्गज नेते आणि साखर सम्राटांच्या मुलाखती घेता आल्या. त्यानंतर मी जनसंघात सक्रीय झालो. जनसंघाचे उमेदवार रामभाऊ गावंडे यांचा केवळ सात हजार मताच्या फरकाने पराभव झाला होता. त्यावेळी मी पूर्णवेळ फुलंब्री मतदारसंघात फिरलो आणि पोस्टर प्रत्येक गावात चिटकविले.

पक्षाचे चिन्ह प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचे ध्येय जनसंघाचे होते. ते काम करण्याची संधी मला मिळाली. त्यानंतर ज्या ठिकाणी कमी मताने पराभव झाला त्या मतदारसंघात तीन वर्ष अगोदरच जनसंघाने संघटन बांधणी केली. 1972 मधील निवडणुकीतही रामभाऊ गावंडे यांचा केवळ सातशे मतांनी पराभव झाला. त्यानंतर आम्ही हार न मानता पुन्हा जोमाने मतदार संघाची बांधणी केली. 1978 च्या निवडणुकीत अडीच हजार मताने रामभाऊ गावंडे विजयी झाले होते.

Governor Haribhau Bagde
Bjp News : फडणवीसांच्या जवळच्या नेत्याच्या तोंडी महायुती तोडण्याची भाषा; म्हणाले, 'भाजपही मनावर दगड ठेवूनच...'

त्यावेळेस मी प्रत्येक गावात जाऊन सायकल भाड्याने घेऊन पोस्टर चिटकाविले. त्यामुळे पक्षाचे काम करताना फळ मिळेल न मिळेल प्रामाणिकपणे काम करत राहिले पाहिजे, असा सल्ला बागडे यांनी पक्षातील नव्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिला. आम्ही बारा आणे रोजाने सायकल किरायाने घेऊन गावोगावी फिरुन पोस्टर चिटकवले.

विजयापेक्षा पक्ष, चिन्ह, विचार मतदारांमध्ये रुजवण्यासाठी काम करायचो. ज्यांच्याकडे अनामत रक्कम भरण्याइतपत पैसे आहेत त्यांना उमेदवारी मिळत. आता परिस्थिती बदलली आहे. परंतु अशा परिस्थितीतही पक्षाचा प्रचार आणि प्रसार प्रामाणिकपणे करावा. केंद्रस्तरावरून प्रत्येक मतदारसंघाचा सर्वे केला जातो. जो उमेदवार सर्वाधिक मते घेऊ शकतो, त्याला पक्ष संधी देत असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Governor Haribhau Bagde
Phulambri Assembly Constituency : कल्याण काळे खासदार झाल्याने फुलंब्रीत ‘भावी आमदारां’चे पीक वाढले उदंड!

अन् थेट आमदार झालो

मी पहिली निवडणूक लढवली 1985 ला आणि त्यात विजयी होऊन आमदार झालो. त्यावेळेस निवडणुकीच्या काळात व्यक्तीला कधीही टार्गेट केले जात नव्हते. पक्षाच्या आणि विकास कामाच्या जोरावर निवडणुका लढविल्या जात होत्या. आत्ताच्या राजकारणात व्यक्तिगत टार्गेट करून निवडणूका लढविल्या जातात. त्यामुळे कुठल्याही पक्षाने व्यक्तीला टार्गेट करून निवडणुकीला सामोरे जाऊ नये, अशी अपेक्षा बागडे यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com